दुकानातील राेख रक्कम, शीतपेय लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:11 IST2021-07-14T04:11:28+5:302021-07-14T04:11:28+5:30

कन्हान : चाेरट्याने दुकानात प्रवेश करून सात हजार रुपये राेख आणि शीतपेयाच्या बाटल्या चाेरून नेल्या. ही घटना कन्हान (ता. ...

Shop line amount, soft drink lamps | दुकानातील राेख रक्कम, शीतपेय लंपास

दुकानातील राेख रक्कम, शीतपेय लंपास

कन्हान : चाेरट्याने दुकानात प्रवेश करून सात हजार रुपये राेख आणि शीतपेयाच्या बाटल्या चाेरून नेल्या. ही घटना कन्हान (ता. पारशवनी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील टेकाडी येथे शुक्रवारी (दि. ९) मध्यरात्री घडली असून, साेमवारी (दि. १०) सकाळी उघडकीस आली.

माेना राजकुमार शुक्ला (३४, रा. टेकाडी, ता. पारशिवनी) यांचे टेकाडी येथील माधव नगरी राेडलगत मिठाईचे दुकान आहे. मध्यरात्री दुकान बंद असताना चाेरट्याने शटरचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. यात त्याने ड्राॅवरमधील सात हजार रुपये राेख व शीतपेयाच्या बाटल्या चाेरून नेल्या. ही बाब लक्षात येताच त्यांनी पाेलिसांत तक्रार नाेंदविली. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस नाईक मनाेज जयस्वाल करीत आहेत.

Web Title: Shop line amount, soft drink lamps