शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

शहीद कुटुंबीयांना अजूनही न्यायाची आस

By admin | Updated: November 23, 2015 02:37 IST

२३ नोव्हेंबर १९९४ चा तो काळाकुट्ट दिवस. नागपुरातील हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर काढलेल्या मोर्च्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ आदिवासी गोवारी बांधवांनी आपले प्राण गमावले.

गोवारी समाजाचा २१ वर्षापासून सुरू आहे अविरत संघर्षनिशांत वानखेडे नागपूर २३ नोव्हेंबर १९९४ चा तो काळाकुट्ट दिवस. नागपुरातील हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर काढलेल्या मोर्च्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ आदिवासी गोवारी बांधवांनी आपले प्राण गमावले. या अमानवीय घटनेला आज तब्बल २१ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र ज्या मागण्यांसाठी सरकारदरबारी हा मोर्चा काढण्यात आला. त्या मागण्या मात्र अद्याप पूर्ण झाल्या नाहीत. २१ वर्षापूर्वी ज्यासाठी ११४ निरपराध गोवारी बांधवांचे बळी गेले, त्या न्यायाची प्रतीक्षा आणखी किती दिवस करावी लागेल, असा प्रश्न स्मारकावर अश्रू ढाळणाऱ्या गोवारी बांधवाना आजही पडतो आहे.तो काळा दिवस...२१ वर्षापूर्वी आजच्याच दिवशी आदिवासी गोवारी जमातीचा भव्य मोर्चा विधानभवनावर धडकला होता. ५० हजाराहून अधिक गोवारी बांधव घरुन भाकरी बांधून मोर्च्यात सहभागी झाले होते. मोर्चा टी-पॉर्इंटवर अडविण्यात आला होता. मुख्यमंत्री मोर्चाला भेट द्यायला येतील म्हणून गोवारी बांधव सायंकाळपर्यंत मोर्च्याच्या ठिकाणी वाट पाहत बसले होते. मात्र सरकारचा एक प्रतिनिधीही भेटायला आला नाही. अचानक एक लाल बत्तीची गाडी आली. मंत्री भेटायला आले, या विचाराने लोक उभे झाले. अशातच रेलिंगला धक्का लागला आणि मोर्चा विधानभवनावर धडकेल, या अविचाराने पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि पुढे घडलेले दृश्य हृदय हेलावून टाकणारे होते. मृत्यूचा सडा पडला होता. मेडिकलमध्येही तेच चित्र होते. कुणाचाही भयाने थरकाप उडेल अशीच अवस्था सगळीकडे दिसत होती. त्यावेळी मोर्च्यात सहभागी झालेल्या कैलास राऊत यांनी ही घटना सांगताना अशी सुन्न करणारी विदारक स्थिती वर्णन केली.केवळ संवेदना, हक्क नाही२३ नोव्हेंबरच्या घटनेमध्ये ११४ गोवारी बांधवांचा बळी जाऊनही निगरगट्ट झालेल्या सरकारवर हवा तसा परिणाम झाला नाही. १५ जून १९९५ ला शासकीय जीआर काढून गोवारी जमातीला २ टक्के आरक्षण असलेल्या विशेष मागास प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले. विशेष म्हणजे या प्रवर्गात आतापर्यंत ४० पेक्षा जास्त जमातींचा समावेश करण्यात आल्याचे कैलास राऊत यांनी सांगितले. ‘गोंड राजगोंड’ बाबतही शासकीय अनुसूचीमध्ये संयुक्त नोंद होती. मात्र २००२ साली केंद्र सरकारने लोकसभेमध्ये दुरुस्ती करून यामध्ये कॉमा लावला व त्यांना विभक्त केले. अशाचप्रकारे गोंड गोवारी यांच्यामध्येही स्वल्पविराम टाकून गोवारींना हक्क प्रदान करावे ही गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आजही प्रलंबित आहे.बळी पडलेल्यांचे कुटुंबीय वाऱ्यावरया घटनेत ११४ गोवारी बांधवांचे बळी गेले. त्यावेळी सरकारतर्फे जुजबी मदत करून सांत्वना करण्यात आली. मात्र न्यायाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. तत्कालीन सरकारने शहीद झालेल्यांच्या कुटुंबीयांपैकी एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र संवेदना व्यक्त करून मोकळ्या झालेल्या सरकारची ही घोषणा हवेत विरली, ती आजतागायत पूर्ण झाली नाही. त्यामुळे ११४ गोवारी बांधवांचे बलिदान व्यर्थ गेले काय, हा प्रश्न आजही समाजाला पडतो आहे.