शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

शाब्बास! नागपूर पोलीस

By admin | Updated: October 13, 2016 03:54 IST

सर्जिकल स्ट्राइकनंतर देशात निर्माण झालेली परिस्थिती देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूरला वेगळी अनुभूती देणारी होती.

नागपूर : सर्जिकल स्ट्राइकनंतर देशात निर्माण झालेली परिस्थिती देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूरला वेगळी अनुभूती देणारी होती. दहशतवादी संघटनांच्या हिटलिस्टवर असलेल्या नागपूरला सुरक्षा यंत्रणांकडून ‘जागते रहो’ अर्थात् सतर्कतेच्या सूचना मिळाल्या होत्या. दरम्यान, पवित्र दीक्षाभूमीवर समतेचे सोने लुटण्यासाठी लाखोंच्या संख्येत बौद्ध बांधव हजेरी लावणार होते. अशा परिस्थितीत शहर पोलिसांची ही अग्निपरीक्षाच होती. परंतु पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी, वाहतूक पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांचे योग्य नियोजन आणि पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे परिश्रम व सतर्कतेमुळे शहरात दसरा व धम्मचक्र प्रवर्तनाचा सोहळा शांततेत यशस्वीपणे पार पडला. पोलीसही या अग्निपरीक्षेत यशस्वी ठरले. दरवर्षीच्या तुलनेत यंदा अधिकच चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी दिवस तसेच रात्र अशा दोन पाळीत सातत्याने कर्तव्य पार पाडले. त्यासाठी १३०० पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचारी (महिला-पुरुष) तैनात करण्यात आले होते. पवित्र दीक्षाभूमीच्या आतबाहेर आणि चोहोबाजूने पोलीस बंदोबस्त होता. साध्या वेशातील जवानही गर्दीच्या आतबाहेर चौकस नजर ठेवून होते. मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही लावण्यात आले होत. दीक्षाभूमी परिसरातील बंदोबस्त हाताळण्यासाठी नियंत्रण कक्ष निर्माण करण्यात आले होते. गर्दीत हरविलेल्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या विशेष पथकानेही मदत केली. कुणालाही, कसलीही अडचण असल्यास पोलीस तात्काळ मदत करायचे. नागरिकांना मार्गदर्शक सूचना देण्यासाठी विविध प्रकारचे फलक या भागात लावण्यात आले होते. पोलीस उपायुक्त दर्जाच्या पाच अधिकाऱ्यांच्या थेट निगराणीत बंदोबस्त ठेवण्यात आला होता, त्यावर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम आणि सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी यांची नजर होती. बारीकसारीक घडामोडींची माहिती सतत घेतली जात होती. . सर्वांना व्यवस्थित जाता-येता यावे, यासाठी विशिष्ट प्रकारची बॅरेकेटिंग करण्यात आली आहे. यासोबतच स्मार्तना पाटील यांनी वाहतूक व्यवस्थेचे यशस्वी नियोजन पार पाडले. त्यामुळे वाहतुकीला खोळंबा झाला नाही. १६ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. वाहनांची कोंडी न झाल्याने अनुयायांना सुद्धा व्यवस्थितपणे दीक्षाभूमीवर येता आले आणि बाहेर जाता आले. (प्रतिनिधी)