शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किमती? ट्रम्प यांनी केली भारतासह जगाची चिंता वाढवणारी घोषणा
2
इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपांवरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही...
3
NEET पेपरफुटीचा खरा मास्टरमाईंड कोण? सीबीआयनं कोर्टात मांडले नवे पुरावे, विद्यार्थ्यांसह पालकही शॉक!
4
जेट, ५० हजार डॉलरचा सूट आणि गर्लफ्रेंडसोबत..., FBI चे डायरेक्टर काश पटेल वादाच्या भोवऱ्यात  
5
खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक
6
"गंगा नदीचे पाणी मिळेल तरच...!" ३० वर्षे जुन्या फरक्का करारावरून बांगलादेशची रडारड; भारतही स्पष्टच बोलला
7
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
8
Jwala Gutta : मातृत्वाची ताकद! ज्वाला गुट्टाने दान केलं ६० लीटर 'ब्रेस्ट मिल्क'; कारण ऐकून कराल सॅल्यूट
9
"घटस्फोटाची प्रक्रिया संपेपर्यंत काम करणार नाही...", प्रसिद्ध अभिनेत्याचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर
10
घटसर्प आजार नेमका काय आहे? मालेगावातील दोन चिमुकल्यांच्या मृत्युनंतर प्रशासन अलर्ट मोडवर!
11
महाराष्ट्रात सरकारी नोकर भरती प्रक्रियेचा कायापालट ! 'बकेट सिस्टीम'चा आधार! कालबाह्य ११०० नियमांना फाटा
12
IPL 2026च्या पॉईंट्स टेबलमध्ये खरी उलथापालथ आज होणार, पंजाबचं भवितव्य ठरणार, सोबतच...
13
सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड, संपत्ती पाहून तपास यंत्रणाही हादरली; एवढा पैसा आला तरी कुठून?
14
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
15
"राजा शिवाजी बघण्याआधीच बाबा गेले...", दिशा परदेशीची खंत, म्हणाली- "ते लोकांना फोन करून सांगत होते की..."
16
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
17
'दुष्काळात तेरावा' नाही, यंदा सुख-समृद्धीचा १३ वा महिना! 'ज्येष्ठ अधिकमास' सुरू; सण-उत्सव २० दिवस लांबणीवर
18
दोन देशात जीवघेण्या विषाणूचा कहर, WHO अलर्टवर, घोषित केली हेल्थ इमर्जन्सी
19
IPL 2026: कोलकाता- गुजरात सामन्याची इतिहासात नोंद; T20 मध्ये पहिल्यांदाच असं घडलं!
20
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
Daily Top 2Weekly Top 5

काम सोडून केस विंचरणे गंभीर गैरवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:12 IST

नागपूर : जबाबदारीचे काम सोडून केस विंचरायला जाणे आणि हटकणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याला शिवीगाळ व मारहाण करणे हे गंभीर स्वरूपाचे ...

नागपूर : जबाबदारीचे काम सोडून केस विंचरायला जाणे आणि हटकणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याला शिवीगाळ व मारहाण करणे हे गंभीर स्वरूपाचे गैरवर्तन आहे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी दिला. तसेच, दोषी कामगार रंगराव चौधरी यांच्या बडतर्फीचा आदेश कायम ठेवला.

चौधरी वानाडोंगरी येथील महर्षी बाबासाहेब केदार सहकारी सूतगिरणीत वाईंडर म्हणून काम करीत होते. २४ एप्रिल १९९५ रोजी ते मशीन एकटी सोडून केस विंचरायला गेले. दरम्यान, स्पिनिंग मास्टर आर. के. जवादे राऊंडवर आले असता, त्यांना चौधरी मशीनजवळ दिसले नाहीत. त्यामुळे त्यांनी चौधरी यांना तत्काळ मशीनजवळ जाऊन कामाला सुरुवात करण्यास सांगितले. परिणामी, चौधरी यांनी चिडून त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. चौकशीत गुन्हा सिद्ध झाल्यामुळे १२ जून १९९७ रोजी त्यांना बडतर्फ करण्यात आले. त्यानंतर आधी कामगार न्यायालयाने १२ डिसेंबर २००५ रोजी तर, पुढे औद्याेगिक न्यायालयाने १९ जुलै २०१४ रोजीच्या निर्णयाद्वारे बडतर्फीचा आदेश कायम ठेवला. त्याविरुद्ध चौधरी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिकाही खारीज करण्यात आली.