शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

दर आठवड्यात पहा सीताबर्डीचा किल्ला

By admin | Updated: November 8, 2015 02:58 IST

सीताबर्डीचा किल्ला नागपूरकरांना पहायचा असल्यास १५ आॅगस्ट किंवा २६ जानेवारीची वाट पहावी लागते.

संरक्षण मंत्र्यांचे गडकरींना पत्र : महापौर प्रवीण दटके यांची माहितीनागपूर : सीताबर्डीचा किल्ला नागपूरकरांना पहायचा असल्यास १५ आॅगस्ट किंवा २६ जानेवारीची वाट पहावी लागते. आता मात्र, नागपूरकरांना आठवड्यातून एकदा किल्ला पाहण्याची संधी मिळणार आहे. संरक्षण मंत्रालयाने त्यासाठी तयारी दर्शविली असून संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे या संदर्भातील संमती दर्शविणारे पत्र केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांना प्राप्त झाले आहे, अशी माहिती महापौर प्रवीण दटके यांनी दिली. नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे टिळक पत्रकार भवनात शनिवारी आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी महापौर दटके म्हणाले, नागनदीची स्वच्छता व सौंदर्यीकरणासाठीही फ्रान्स, चीन व जपान या देशांकडून कर्ज मिळवून देण्यासाठी मदत करण्याची तयारी पर्यावरण मंत्रालयाने दर्शविली आहे. पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडूनही या संबधीचे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्राप्त झाले असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यावर भर दिला जाणार असून फुटाळा, अंबाझरी या दोन्ही तलावांवर लाईट अ‍ॅण्ड साऊंड शो सुरू केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)मनपासाठी हवे विशेष पोलीस ठाणेअतिक्रमण, मोकाट जनावरे सोडणाऱ्यांवर कारवाई, एलबीटी धाडी याशिवाय अनेक प्रकरणांमध्ये महापालिकेला पोलिसांच्या मदतीची गरज भासते. बऱ्याचदा वेळेवर पोलिसांकडून पुरेशी मदत मिळत नाही. त्यामुळे महापालिकेशी संबंधित प्रश्न हाताळण्यासाठी एक विशेष पोलीस ठाणे असावे, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. संबंधित पोलीस ठाण्यात असलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार महापालिका देईल, पोलीस ठाण्यासाठी जागा महापालिका उपलब्ध करून देईल, अशी तयारीही राज्य सरकारकडे दर्शविण्यात आली आहे. लवकरच राज्य सरकार यावर निर्णय घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ३२४ कोटींचे सिमेंट रस्ते नागपूर शहरातील रस्ते येत्या काळात गुळगुळीत झालेले दिसतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानंतर महापालिकेने सिमेंटचे रस्ते करण्यासाठी ३२४ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रकल्पासाठी नासुप्र व राज्य सरकार प्रत्येकी १०० कोटी रुपये देणार आहे. ७९ किलोमीटर लाबींच्या या रस्त्यांचे २२ पॅकेज तयार करण्यात आले असून रस्त्यांचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. २० डिसेंबरपर्यंत पहिल्या ११ पॅकेजचे काम सुरू होईल. यापूर्वीही सिमेंट रस्त्यांसाठी महापालिकेतर्फे १०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. या निधीत अतिरिक्त २६ किमीचे रस्ते बांधले जातील, असे महापौर दटके यांनी स्पष्ट केले. मोकाट जनावरे गो-शाळेला देणारशहरात रस्त्यांवर गाई, म्हशींसह मोकाट जनावरे फिरताना दिसतात. सध्या कोंडवाडा विभागातर्फे ही जनावरे पकडून कांजीहाऊसमध्ये बंद केली जातात. जनावरांचे मालक दंड भरून ते सोडवून नेतात व पुन्हा रस्त्यावर सोडतात. यावर स्थायी उपाय योजण्यासाठी महापालिकेतर्फे नवे धोरण आखण्यात येत आहे. या धोरणानुसार पकडलेल्या गाई, म्हशी, जनावरे गो-शाळेला दिली जातील. तेथेच त्यांचे संगोपन केले जाईल. यासाठी संस्थांनी पुढाकार घेतला तर महापालिका त्यांना जागा उपलब्ध करून देईल, असेही महापौरांनी स्पष्ट केले.