शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

स्पोर्टस् कॉम्प्लेक्ससाठी नव्या जमिनीचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 02:06 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने स्पोर्टस् कॉम्प्लेक्ससाठी नवीन जागेचा शोध घेणे सुरू केले आहे.

सर्च समितीची होईल बैठक : विद्यापीठाच्या जमिनींची होईल पाहणीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने स्पोर्टस् कॉम्प्लेक्ससाठी नवीन जागेचा शोध घेणे सुरू केले आहे. यासाठी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेत समिती गठित केली असून, २६ जुलैला समितीची बैठक होण्याची शक्यता आहे. बैठकीत स्पोर्टस् कॉम्प्लेक्ससाठी नवीन जागा शोधण्यासाठी समिती दौरासुद्धा करणार आहे. लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार, विद्यापीठाने अंबाझरी रोड येथील पांढराबोडीजवळ रिकाम्या असलेल्या जागेवर स्पोर्टस् कॉम्प्लेक्स बनविण्याचा विचार केला आहे. लोकमतने केलेल्या खुलाशानंतर कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी समितीची लवकरात लवकर बैठक आयोजित करण्यास सांगितले होते. परंतु डॉ. येवले हे पुण्याला गेले असल्याने बैठक होऊ शकली नाही. येवले सोमवारी पोहोचल्यानंतर या मुद्यावर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे विद्यापीठाच्या रविनगर येथील क्रीडा संकुलात स्पोर्टस् कॉम्प्लेक्स बनविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी २६१ वृक्ष कापण्याची तयारी करण्यात आली होती. महापालिकेनेही कुठलीही शहानिशा न करता मंजुरी दिली होती. २१ जुलैला ‘लोकमत’ने ‘स्पोर्टस् कॉम्प्लेक्ससाठी कापणार २६१ वृक्ष’ या आशयाची बातमी प्रकाशित केली होती. ही बातमी प्रकाशित झाल्यानंतर विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती. त्यामुळे कुठल्याही वादात पडण्यापेक्षा विद्यापीठाने नव्याने जमिनीचा शोध घेण्याचा निर्णय घेतला.