शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

श्रीसूर्यामध्ये एसडीओ सक्षम अधिकारी

By admin | Updated: July 2, 2014 00:53 IST

श्रीसूर्या गुंतवणूकदार फसवणूकप्रकरणात नागपूरच्या उपविभागीय अधिकाऱ्याची (एसडीओ) सक्षम अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने ३० जून रोजी

हायकोर्टात माहिती : गृह विभागाचा जीआरनागपूर : श्रीसूर्या गुंतवणूकदार फसवणूकप्रकरणात नागपूरच्या उपविभागीय अधिकाऱ्याची (एसडीओ) सक्षम अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने ३० जून रोजी यासंदर्भात जीआर काढला आहे. सरकारी वकिलाने आज, मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली. ‘महाराष्ट्र ठेवीदारांचे हित व संरक्षण कायदा-१९९९’ अनुसार गुंतवणूकदारांच्या फसवणूकप्रकरणात राज्य शासनाने सक्षम अधिकारी नियुक्त करणे आवश्यक आहे. परंतु, श्रीसूर्या प्रकरणात अनेक महिने लोटूनही सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली नव्हती. यामुळे शीतल धिरडे यांनी रिट याचिका दाखल केली होती. धिरडे यांनी श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट कंपनीत ३६ लाख २८ हजार ५०० रुपयांची गुंतवणूक केली आहे. उद्देश पूर्ण झाल्यामुळे न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व विश्वास जाधव यांनी याचिका निकाली काढली आहे.गुंतवणूकदारांच्या फसवणूकप्रकरणात कायद्यानुसार सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी लागते. हा अधिकारी उपजिल्हाधिकारी किंवा त्यांच्यापेक्षा वरच्या श्रेणीचा असतो. नियुक्ती झाल्यानंतर सक्षम अधिकारी गुंतवणुकीच्या रकमेची वसुली व इतर आवश्यक कारवाईसाठी संबंधित न्यायालयात अर्ज दाखल करतो. श्रीसूर्या समूहांतर्गत गुंतवणूक कंपनीसह बांधकाम, दूध, रेस्टॉरेंट्स, व्यायामशाळा, परिवहन, रुग्णालये, विमा इत्यादी विविध व्यवसाय आहेत. समूहाचा अध्यक्ष समीर सुधीर जोशी व संचालिका पल्लवी समीर जोशी यांनी १८ महिन्यांत रक्कम दुप्पट करून देणे, २५ महिन्यांपर्यंत गुंतवणुकीवर १५० टक्के व्याज देणे अशा विविध आकर्षक योजनांचे आमीष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची शेकडो कोटी रुपयांनी फसवणूक केली आहे. जोशी दाम्पत्य चर्चासत्र व एजेंट्सच्या माध्यमातून योजनांचा प्रचार करीत होते. जोशी दाम्पत्याविरुद्ध राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात गेल्या १४ सप्टेंबर रोजी भादंविच्या कलम ४२०, ३४ व महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण कायद्याच्या कलम ३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. प्रशांत गोडे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)