शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

स्कॉर्पिओची धडक, दोन मित्र जखमी, एकाचा मृत्यू

By दयानंद पाईकराव | Updated: May 26, 2024 16:40 IST

भरधाव स्कॉर्पिओने धडक दिल्यामुळे ट्रीपलसीट जाणाऱ्या मित्रांपैकी एकाचा मृत्यू झाला.

नागपूर : भरधाव स्कॉर्पिओने धडक दिल्यामुळे ट्रीपलसीट जाणाऱ्या मित्रांपैकी एकाचा मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी २६ मे रोजी मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास घडली.

शुभम सुनिल गणेर (३०, रा. न्यु सुभेदार ले आऊट, हुडकेश्वर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या मित्राचे नाव आहे. तर रजत हिरालाल बेले (२६, रा. श्रीरामनगर, उदयनगर, हुडकेश्वर) आणि अतुल विनायक रामटेके (४१, रा. न्यु सुभेदार ले आऊट, हुडकेश्वर) अशी गंभीर जखमी झालेल्या मित्रांची नावे आहेत. रविवारी रात्री १.३० वाजता रजत आपली दुचाकी क्रमांक एम. एच. ४९, बी. जी-७३८१ ने आपले मित्र अतुल आणि शुभमसोबत ट्रीपलसीट जात होता. पिपळा रेसिडेन्सी लॉनसमोरून जात असताना मागून येणाऱ्या स्कॉर्पिओ क्रमांक एम. एच. १५, डी. सी-९४२७ च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

यात तीघेही दुचाकीखाली पडून गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मेडिकलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी शुभमला तपासून मृत घोषित केले. तर जखमी रजत आणि अतुलचा उपचार सुरु आहे. रजतने दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी स्कॉर्पिओ चालकाविरुद्ध कलम २७९, ३३८, ३०४ (अ), ४२७ नुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे.