शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

स्कूल बसने बालकाला चिरडले

By admin | Updated: January 30, 2016 03:13 IST

घरासमोर खेळणाऱ्या दोन भावंडांना भरधाव स्कूल बसने चिरडले. त्यात दीप संतोष पाल या एक वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.

दुसरा गंभीर : बिडीपेठमध्ये प्रचंड तणावनागपूर : घरासमोर खेळणाऱ्या दोन भावंडांना भरधाव स्कूल बसने चिरडले. त्यात दीप संतोष पाल या एक वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. तर, त्याचा अडीच वर्षीय भाऊ दीपक गंभीर जखमी झाला. सक्करदऱ्यातील न्यू बिडीपेठ भागात झालेल्या या भीषण अपघातामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. संतोष पाल (वय ३०) उमाकांत सोनवणे यांच्या घरी भाड्याने राहातो. रस्त्याला लागून असलेल्या घरामुळे संतोषची दोन्ही मुलं शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता अंगणात खेळत होती. त्यांची आई दारात बसून मुलांचे कौतुक पाहत होती. अचानक स्कूल बस (एमएच ४९/ जे ०११०) वेगात आली आणि दीप तसेच दीपकला चिरडले. ते पाहून त्यांची आई आरडाओरड करीत समोर आली. तिने मुलांना कसेबसे बाहेर ओढले. गंभीर अवस्थेतील या चिमुकल्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी चिमुकल्या दीपला मृत घोषित केले. दिवसाढवळ्या झालेल्या या भीषण अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड शोकसंतप्त वातावरण निर्माण झाले. संतप्त नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने तणाव निर्माण झाला. या अपघाताला स्कूल व्हॅन चालकासह महापालिका प्रशासनही जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी लावला. या रस्त्याचे काही दिवसांपूर्वीच डांबरीकरण करण्यात आले. त्यावेळी नागरिकांनी रस्त्यालगत घरे असल्याने आणि वाहनांची मोठी वर्दळ असल्याने स्पीड ब्रेकर लावण्याची मागणी केली.आई वडिलांवर आघातया अपघातामुळे पाल दाम्पत्यावर जोरदार मानसिक आघात झाला आहे. डोळ्यादेखत चिमुकला गमावल्याने या दोघांची अवस्था वेड्यागत झाली आहे. परिसरातही तीव्र शोककळा पसरली आहे. वृत्त लिहिस्तोवर आरोपी वाहनचालकाला अटक झाली की नाही ते पोलिसांकडून स्पष्ट झाले नव्हते.