शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किमती? ट्रम्प यांनी केली भारतासह जगाची चिंता वाढवणारी घोषणा
2
इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपांवरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही...
3
खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक
4
"गंगा नदीचे पाणी मिळेल तरच...!" ३० वर्षे जुन्या फरक्का करारावरून बांगलादेशची रडारड; भारतही स्पष्टच बोलला
5
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
6
मातृत्वाची ताकद! ज्वाला गुट्टाने दान केलं ६० लीटर 'ब्रेस्ट मिल्क'; कारण ऐकून कराल सॅल्यूट
7
"घटस्फोटाची प्रक्रिया संपेपर्यंत काम करणार नाही...", प्रसिद्ध अभिनेत्याचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर
8
घटसर्प आजार नेमका काय आहे? मालेगावातील दोन चिमुकल्यांच्या मृत्युनंतर प्रशासन अलर्ट मोडवर!
9
महाराष्ट्रात सरकारी नोकर भरती प्रक्रियेचा कायापालट ! 'बकेट सिस्टीम'चा आधार! कालबाह्य ११०० नियमांना फाटा
10
IPL 2026च्या पॉईंट्स टेबलमध्ये खरी उलथापालथ आज होणार, पंजाबचं भवितव्य ठरणार, सोबतच...
11
सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड, संपत्ती पाहून तपास यंत्रणाही हादरली; एवढा पैसा आला तरी कुठून?
12
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
13
"राजा शिवाजी बघण्याआधीच बाबा गेले...", दिशा परदेशीची खंत, म्हणाली- "ते लोकांना फोन करून सांगत होते की..."
14
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
15
'दुष्काळात तेरावा' नाही, यंदा सुख-समृद्धीचा १३ वा महिना! 'ज्येष्ठ अधिकमास' सुरू; सण-उत्सव २० दिवस लांबणीवर
16
दोन देशात जीवघेण्या विषाणूचा कहर, WHO अलर्टवर, घोषित केली हेल्थ इमर्जन्सी
17
IPL 2026: कोलकाता- गुजरात सामन्याची इतिहासात नोंद; T20 मध्ये पहिल्यांदाच असं घडलं!
18
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
19
मौनी रॉय अन् सूरज नांबियारचं पॅचअप? घटस्फोट जाहीर केल्यानंतरही पुन्हा केलं एकमेकांना फॉलो
20
विकी कौशलच्या वाढदिवशी कतरिनाची भावुक अन् मजेशीर पोस्ट, छोट्या विहानचीही दिसली झलक
Daily Top 2Weekly Top 5

पश्‍चिम विदर्भात एक लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा

By admin | Updated: May 25, 2014 00:50 IST

पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात या खरीप हंगामात किमान एक लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता खुद्द कृषी विभागाने वर्तविली आहे

यवतमाळ : पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात या खरीप हंगामात किमान एक लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता खुद्द कृषी विभागाने वर्तविली आहे. हा तुटवडा भरुन काढण्यासाठी उपलब्ध बियाणे वाचविणे आणि नव्या बियाण्यांचा शोध घेण्याची मोहीम कृषी खात्याने हाती घेतली आहे.

अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वाशिम या पाच जिल्ह्यात खरिपाचे ३२ लाख हेक्टर लागवड क्षेत्र आहे. त्यातील १६ लाख ५0 हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनचा पेरा होण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात सोयाबीनचे पाच हजारावर गेलेले भाव लक्षात घेता शेतकर्‍यांचा कल सोयाबीन लागवडीकडे अधिक आहे. प्रती हेक्टरी ७५ किलो प्रमाणे अमरावती विभागाला १२ लाख क्विंटल सोयाबीन बियाणे लागणार आहे. गेल्या वर्षी अकाली पावसामुळे सोयाबीनचे बियाणे निकृष्ट झाले. एवढेच नव्हे तर महाबीजचे प्लॉटस्ही फेल झाले. चाचणीत या बियाण्यांची उगवण क्षमता ७0 टक्क्यापेक्षा बरीच कमी असल्याचे सिद्ध झाले. महाबीजकडून दोन लाख क्विंटल बियाण्याची अपेक्षा असताना प्रत्यक्षात त्यांच्याकडून केवळ ७0 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. कृषी खात्याने केलेल्या सर्वेक्षणात शेतकर्‍यांकडे साडेचार लाख क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याचे आढळून आले. तर दहा ते बारा चांगल्या खासगी कंपन्यांकडून साडेचार लाख क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. अशा विविध मार्गाने ११ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध होणार असले तरी एक लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा भासणार आहे. तो भरुन काढण्यासाठी कृषी विभागाची धडपड सुरू आहे. त्यासाठी शेतकर्‍यांना घरचेच बियाणे वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गावागावांत अतिरिक्त बियाणे असलेल्या शेतकर्‍यांकडून इतर शेतकर्‍यांनी सोयाबीन बियाणे उपलब्ध करून घ्यावे, असे आवाहन कृषी खात्याकडून करण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)