शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले उपग्रह जाणार अंतराळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:19 IST

मंगेश व्यवहारे देशभरातील एक हजार विद्यार्थ्यांमध्ये निवड : उपक्रमाची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार नोंद नागपूर : तामिळनाडूतील रामेश्वरम येथे ७ ...

मंगेश व्यवहारे

देशभरातील एक हजार विद्यार्थ्यांमध्ये निवड : उपक्रमाची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार नोंद

नागपूर : तामिळनाडूतील रामेश्वरम येथे ७ फेब्रुवारीला जागतिक रेकॉर्ड बनविण्याची तयारी सुरू आहे. यासाठी देशभरातील १ हजार विद्यार्थी १०० उपग्रह बनवित आहेत. ते उपग्रह अंतराळात ७ फेब्रुवारीला सोडण्यात येणार आहे. यासाठी देशभरातून अंतराळाची आवड असणाऱ्या १००० विद्यार्थ्यांची निवड केली जात आहे. यात नागपूर महापालिकेच्या सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेच्या दोन विद्यार्थिनींची निवड झाली आहे. ही बाब नागपूर महापालिकेसाठी गौरवास्पद आहे.

मनपाच्या शाळांची अवस्था सर्वांना परिचित आहे. पण सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी मनपाच्या शाळेतही गुणवत्ता ठासून भरली असल्याचा परिचय करून दिला आहे. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनचा हा उपक्रम आहे. यात देशभरातून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची निवड केली जात आहे. शालेय जीवनात अंतराळ तंत्रज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण करून भविष्यात स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये विद्यार्थ्यांचे योगदान वाढावे ही यामागील संकल्पना आहे. यात जगातील सर्वात कमी वजनाचे १०० उपग्रह बनवून ७ फेब्रुवारी रोजी ३८००० मीटर उंचीवर सोडण्यात येणार आहे. हे उपग्रह प्रत्यक्ष वातावरणाची माहिती घेऊन पृथ्वीवरील केंद्राला पाठवतील. हा उपक्रम एक जागतिक विक्रम होणार आहे. यामध्ये सहभाग घेण्यासाठी मनपाच्या सुरेंद्रगड शाळेच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरले होते. यात स्वाती मिश्रा व काजल शर्मा या दोन विद्यार्थिनींची निवड झाली आहे.

सध्या डॉ. ए.पी. जे कलाम फाऊंडेशनतर्फे उपग्रह बनविण्यासाठी या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रशिक्षण सुरू आहे. या विद्यार्थ्यांना वर्ल्ड रेकॉर्डच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये जॉईन करण्यात आले आहे. १८ ते २२ दरम्यान पुणे येथे ऑफलाईन प्रशिक्षण होणार आहे. यात उपग्रह बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सोबतच ते बनविण्यासाठी आवश्यक असलेली कीट सुद्धा दिली जाणार आहे. या उपक्रमासाठी सहभागी विद्यार्थ्यांकडून १० हजार रुपये शुल्क आकारण्यात येत होते. पण मनपाच्या या विद्यार्थ्यांकडून सहभाग शुल्क घेण्यात आले नाही. जागतिक रेकॉर्डमध्ये आपली निवड झाल्याबद्दल दोन्ही विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.

- आमचे विद्यार्थी यापूर्वीही मंगळ अभियानात सहभागी झाले होते. आता रामेश्वरम येथे प्रस्थापित होणाऱ्या जागतिक विक्रमासाठी आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांची निवड होणे हे महापालिकेसाठी गौरवास्पद बाब आहे. स्लम भागातील ही मुले आहेत. पण शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी या मुलांच्या क्षमतेचा पूर्णपणे वापर केला आहे. या मुलांची अशा उपक्रमात निवड होणे ही मनपा शाळेच्या गुणवत्तेची पावती आहे.

-दीप्ती बिस्ट, विज्ञान शिक्षिका, सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळा