शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

१५0 रुपयांसाठी हत्या!

By admin | Updated: May 8, 2014 02:50 IST

कोणताही पुरावा नसताना कचरा वेचणाऱ्याच्या हत्येचा अवघ्या दोन दिवसात उलगडा करून आरोपींना जेरबंद करण्यात तहसील पोलिसांनी यश मिळवले

कचरा वेचणार्‍याच्या हत्येचा छडा : आरोपी जेरबंद

नागपूर : कोणताही पुरावा नसताना कचरा वेचणार्‍याच्या हत्येचा अवघ्या दोन दिवसात उलगडा करून आरोपींना जेरबंद करण्यात तहसील पोलिसांनी यश मिळवले. सुरेश ऊर्फ भुर्‍या मनराखन शाहू (वय २९, रा. विजय नगर, बाजार चौक, कळमना) आणि प्रमोद ऊर्फ बबलू दामाजी धांडे (वय ३५, रा. मालनी, ता. कुही, जि. नागपूर) अशी आरोपींची नावे आहेत. केवळ १५0 रुपयांसाठी या दोघांनी कचरा वेचणार्‍या नीलेश ऊर्फ निल्या काशीनाथ धुंडे (वय २५) याची अमानुष हत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली.
तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत भावसार मंगल कार्यालयाजवळ ४ मे च्या सकाळी ७.३0 वाजता नीलेशचा मृतदेह आढळला होता. नीलेश मूळचा खापरखेडा, येथील रहिवासी होता. तो कचरा वेचून उदरनिर्वाह करीत होता. तहसील परिसरातच आरोपी सुरेश शाहू आणि प्रमोद धांडे यांच्यासोबत त्याची ओळख झाली. आरोपींना दारू, गांजाचे व्यसन असल्यामुळे अनेकदा व्यसन भागवण्यासाठी ते एकमेकांकडून पैसे उधार घेत होते. नीलेश याच्यासोबतही त्यांचा पैशाचा व्यवहार झाला होता. नीलेशने प्रमोदला ५0 रुपये दिले होते. तर, सुरेशकडून १५0 रुपये उधार घेतले होते. आपले पैसे परत मिळावे म्हणून सुरेशने नीलेशच्या मागे तगादा लावला होता तर, प्रमोद नीलेशचे ५0 रुपये देण्यासाठी टाळाटाळ करीत होता. ३ मे च्या रात्री याच कारणावरून त्यांच्यात वाद झाला. प्रमोदकडून पैसे परत मिळाल्यानंतर तुला तुझे पैसे देईन, असे नीलेशने सुरेशला सांगितले. सुरेशने मात्र आत्ताच पैसे पाहिजे म्हणून अट्टहास मांडला. वाद वाढला आणि आरोपी सुरेश तसेच प्रमोदने नीलेशचा दगडाने ठेचून खून केला. (प्रतिनिधी)