शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

देशभरात ‘रोहित अ‍ॅक्ट’ लागू व्हावा

By admin | Updated: October 13, 2016 06:31 IST

रोहित वेमुला प्रकरण हे केवळ हैदराबाद विद्यापीठाशी संबंधित नाही. देशातील प्रत्येक विद्यापीठांत विद्यार्थ्यांसोबत असाच भेदभाव सुरू आहे.

नागपूर : रोहित वेमुला प्रकरण हे केवळ हैदराबाद विद्यापीठाशी संबंधित नाही. देशातील प्रत्येक विद्यापीठांत विद्यार्थ्यांसोबत असाच भेदभाव सुरू आहे. त्यामुळे देशातील कोणत्याही विद्यार्थ्यांसोबत जाती, धर्म, लिंग असा कुठल्याच प्रकारचा भेदभाव होऊ नये, यासाठी स्वतंत्र कायदा करून त्याला ‘रोहित अ‍ॅक्ट’ असे नाव द्यावे. त्यासाठी कृती समिती स्थापन करण्यात आली असून त्यामाध्यमातून माझा लढा सुरूच राहणार आहे, असे रोहित वेमुलाची आई राधिका वेमुला यांनी रविभवन येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. राधिका वेमुला यांनी तेलगू भाषेत संवाद साधला. रोहित अ‍ॅक्ट जॉयंट अ‍ॅक्शन कमिटीचे संयोजक तन्नाही मुन्ना यांनी त्याचे हिंदीत भाषांतर केले. रोहितच्या आत्महत्येला नऊ महिने झाले परंतु अजूनही त्याला न्याय मिळाला नाही, याकडे लक्ष वेधून त्या म्हणाल्या की, जातिभेदाचे चटके मी लहानपणापासून सोसले आहेत. मला एका शिक्षक कुटुंबाने दत्तक घेतले होते. तेव्हा मला काही समजतही नव्हते. परंतु त्यांनी मला मुलगी म्हणून नव्हे तर घरकाम करण्यासाठी दत्तक घेतले होते. त्यांनी दहवीपर्यंत शिकवले. परंतु घरकाम करताना ते मला माझ्या माला जातीच्या नावावर शिवीगाळ करायचे. लग्नानंतरही मला सासरी जातीवरुन त्रासच मिळाला. रोहित हा आंबेडकरी विचारांसाठी लढत होता. तो गेल्यावर मी आणि माझा मुलगा राजा याने मुंबई येथे १४ एप्रिल रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यामुळे आपणही आता आंबेडकरी चळवळीसाठी लढत राहू.आंबेडकर स्टुंडट असोसिएशनच्या बॅनर अंतर्गत रोहित व आम्ही लढत होता. कुलगुरू आप्पाराव हे मुख्य आरोपी आहेत. यासोबत सुशीकुमार, रामचंद्र राव, बंडारु दत्तात्रय, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आदींविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी, असे हैदराबाद विद्यापीठातील आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचे तन्नाही मुन्ना यांनी सांगितले. आमच्यावर आजही कुलगुरू पाळत ठेवून असतात, अशा परिस्थितीत आम्ही लढत असल्याचेही त्याने सांगितले. (प्रतिनिधी)