शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर टोमॅटोचा सडा

By admin | Updated: November 16, 2016 02:54 IST

गडचिरोलीहून नागपूरच्या दिशेने टोमॅटो घेऊन येत असलेल्या भरधाव मालवाहू बोलेरोच्या चालकाचा ताबा सुटल्याने उलटली.

भरधाव बोलेरो उलटली : चालक, क्लिनर किरकोळ जखमीभिवापूर : गडचिरोलीहून नागपूरच्या दिशेने टोमॅटो घेऊन येत असलेल्या भरधाव मालवाहू बोलेरोच्या चालकाचा ताबा सुटल्याने उलटली. त्यात चालक व क्लिनर किरकोळ जखमी झाले असून रोडवर टोमॅटोचा सडा पडला होता. ही घटना भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-गडचिरोली मार्गावरील मरू नदीच्या पुलाजवळ मंगळवारी दुपारी घडली.एमएच-४९/डी-३१५४ क्रमांकाची मालवाहू बोलेरो टमाटर घेऊन गडचिरोलीहून भिवापूरमार्गे नागपूरच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती. ही बोलेरा भिवापूरनजीकच्या मरू नदीच्या पुलाजवळ पोहोचताच चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि बोलेरो रोडच्या मध्यभागी उलटली. त्यामुळे बोलेरोतील टोमॅटो रोडवर पसरले, शिवाय या मार्गावरील वाहतूक काही काळ प्रभावित झाली होती. नागरिकांनी रोडवरील टोमॅटो पायदळी तुडविल्याने रोडवर चिखल तयार झाला होता.माहिती मिळताच भिवापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या अपघातात किरकोळ जखमी झालेल्या वाहनचालक व क्लिनरला उपचारासाठी भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले, तसेच रोडवरील बोलेरो बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी भिवापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. (तालुका प्रतिनिधी)नागरिकांचा टोमॅटोवर डल्लानागपूर-गडचिरोली मार्ग वर्दळीचा आहे. शिवाय घटनास्थळ हे भिवापूरपासून एक कि.मी. अंतरावर असल्याने अपघातग्रस्त वाहन टोमॅटोचे असल्याची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळ गाठले. त्यांना वाहनात व रोडवर टोमॅटो पडले असल्याचे दिसताच अनेकांनी टोमॅटो उचलून घरी नेले. काही टोमॅटो पायदळी तुडविले गेल्याने रोडवर ‘लाल चिखल’ तयार झाला होता.