शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

फुटाळा तलावाला विसर्जनाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:37 IST

शहरातील पारंपरिक स्रोत असलेल्या तलावांना आता सार्वजनिक उत्सवांमुळे धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देपाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण घटले : पर्यावरणवादी संस्थांनी केले पाण्याचे परीक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील पारंपरिक स्रोत असलेल्या तलावांना आता सार्वजनिक उत्सवांमुळे धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणवादी संस्थांनी शहरातील तलावांच्या पाण्याचे शास्त्रीय परीक्षण केले असता, पाण्यात आढळणाºया घटकांवर त्याचे परिणाम झाल्याचे पुढे आले आहे. या परीक्षणात फुटाळ्यातील पाण्याच्या घटकांवर सर्वाधिक परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. येणाºया गणपती उत्सवात विसर्जनावर नियंत्रण न मिळविल्यास फुटाळा धोक्याची पातळी ओलांडणार असल्याची भीती पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.शहरातील ग्रीन व्हिजिल या पर्यावरणवादी संस्थेतर्फे सोनेगाव, फुटाळा व गांधीसागर तलावातील पाण्याचे परीक्षण करण्यात आले. प्रत्येक तलावातील पाण्याचे सहा नमुने घेण्यात आले. पाण्यात आम्लता, तापमान, गढूळपणा व आॅक्सिजनचे प्रमाण हे चार महत्त्वाचे घटक असतात. संस्थेतर्फे या चारही घटकाचे तलावातील प्रमाण नोंदविण्यात आले. या चारही घटकात आॅक्सिजनचे प्रमाण महत्त्वाचा घटक आहे. गांधीसागर आणि सोनेगाव तलावाच्या तुलनेत फुटाळ्याच्या पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याचे आढळले. त्याचबरोबर पाऊस कमी झाल्याने पाण्यात गढूळपणाही आढळला. लवकरच गौरी, गणपती आणि नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. शहरात १३०० च्या जवळपास सार्वजनिक गणपती मंडळ आहेत. सोनेगाव, सक्करदरा तलावात विसर्जनास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मंडळाच्या गणपतीबरोबरच घरगुती गणपतीच्या विसर्जनाचा सर्वाधिक भार फुटाळा तलावावर पडणार आहे. विसर्जनावर अपेक्षित अंकुश न लावल्यास तलावातील आॅक्सिजनची पातळी घटण्याची शक्यता आहे. असे झाल्यास तलावातील जीवाष्मांना धोका होण्याची शक्यता आहे.फुटाळ्याच्या परीक्षणात आलेले निष्कर्ष खरंच गंभीर आहेत. त्याचा परिणाम पाण्यातील जीवाष्मांना होणार आहे. येणाºया उत्सावाच्या काळात तलावाचे प्रदूषण टाळण्यासाठी प्रशासनासोबत जनतेचेही कर्तव्य आहे.कौस्तुभ चॅटर्जी, समन्वयक, ग्रीन व्हिजिल