शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांचा हक्क निर्धार मोर्चा

By admin | Updated: December 24, 2014 00:43 IST

एकीकडे राज्यातील अनुसूचित जमातीच्या यादीत धनगर आणि इतर गैरआदिवासी जातींचा समावेश करावा म्हणून सरकारवर दबाव आणला जात आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या निर्मितीपासून क्षेत्रबंधन

आदिवासी विद्यार्थी संघ, विदर्भ : औरंगाबादसह विदर्भातून एकत्र आले विद्यार्थीनागपूर : एकीकडे राज्यातील अनुसूचित जमातीच्या यादीत धनगर आणि इतर गैरआदिवासी जातींचा समावेश करावा म्हणून सरकारवर दबाव आणला जात आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या निर्मितीपासून क्षेत्रबंधन आणि बोगस आदिवासींच्या अतिक्रमणामुळे खऱ्या आदिवासींचे आजवर प्रचंड नुकसान झाले आहे. नव्या सरकारला याची जाणीव व्हावी आणि खऱ्या आदिवासींचे प्रश्न गांभीर्यांने सोडवावेत, यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी मंगळवारी विधानभवनावर ‘हक्क निर्धार’ मोर्चा काढला.आदिवासी विद्यार्थी संघ, विदर्भाच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चात पहिल्यांदाच शेकडोच्या संख्येत विद्यार्थी एकत्र आले होते. मोर्चाला आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा व अंबरिश राजे आत्राम हे भेट देतील, अशा अनेकांच्या अपेक्षा होत्या. परंतु मंत्री मोर्चात येणारच नसल्याचा निरोप आल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली. यातील काही विद्यार्थी ठिय्या आंदोलन करण्याच्या विचारात होते. तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र मंत्र्यांनी सायंकाळी भेटण्यास बोलविल्याने तणाव निवळला. मोर्चाच्या शिष्टमंडळाने राज्यमंत्री राजे अंबरिश राजे आत्राम यांना भेटून मागण्यांचे निवेदन दिले. त्यावेळी आत्राम यांनी मागण्यांवर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. मोर्चाला आ. संजय कुराम, आ. राजू तोडसाम यांनीही भेटी दिल्या. नेतृत्व डॉ. नरेश उईके, मुकेश नरोटे, गजानन कुमरे, जयमाला पारवेकर, रंजित सयाम.मागण्याधनगर आणि इतर कोणत्याही जातीचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करू नये.बोगस आदिवासींना संरक्षण देणारा अध्यादेश त्वरित रद्द करावा.अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर कार्यरत असलेल्या केंद्रीय व राज्य कर्मचाऱ्यांची जात पडताळणी करून कारवाई करावी.वसतिगृह व आश्रम प्रशस्त इमारतींचे बांधकाम योजनाबद्ध व त्वरेने सुरू करावे. प्रकाश झुंगरे परिवाराच्या हत्याप्रकरणी सीबीआय चौकशी करावी.