शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

रागसंगीतांच्या संमिश्रतेने रंगलेले गायन

By admin | Updated: June 30, 2014 00:46 IST

अमेरिकेतल्या व्यस्त दिनक्रमातून शास्त्रीय संगीताची साधना करणाऱ्या उच्चविद्याविभूषित अभियंता दीपाली घाटे-देगलूरकर यांच्या गायनाने रसिकांना आनंद मिळाला. या मैफिलीचे आयोजन

सप्तकचे आयोजन : दीपाली घाटे-देगलूरकर यांची मैफिल नागपूर : अमेरिकेतल्या व्यस्त दिनक्रमातून शास्त्रीय संगीताची साधना करणाऱ्या उच्चविद्याविभूषित अभियंता दीपाली घाटे-देगलूरकर यांच्या गायनाने रसिकांना आनंद मिळाला. या मैफिलीचे आयोजन सप्तक संस्थेच्यावतीने करण्यात आले. मूळ नागपूरच्या या गायिकेने आपल्या गानप्रतिभेने रसिकांची दाद घेतली. गुरूकडून आत्मसात केलेल्या रागसंगीताचे हे प्रामाणिक व श्रवणीय सादरीकरण होते. हा कार्यक्रम सायंटिफिक सभागृहात पार पडला. दीपाली यांनी वयाच्या ५ व्या वर्षापासून शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या गायन शैलीचे धडे माता रंजना घाटे यांच्याकडे गिरविले. पं. प्रभाकरराव खर्डेनवीस आणि त्यानंतर विख्यात गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले.त्यामुळेच दीपाली यांच्या गायनात किराणा, ग्वाल्हेर व जयपूर-अत्रोली घराण्याच्या खास सौंदर्यात्मक संमिश्र गाण्यांनी ही मैफिल रंगतदार ठरली. राग बागेश्रीने त्यांनी गायनाला प्रारंभ केला. विलंबित एकताल निबद्ध ‘कौन गत भयी...’ आणि मध्य लयीत ‘आयी रे सनन सन घन आयी...’ तर द्रुत लयीत ‘ना डारो रंग मोपे...’ या बंदिशींनी त्यांनी सुखावह रागाची बढंत सादर केली. त्यानंतर राग मिश्र खमाजमधील उपशास्त्रीय प्रकारातील दादरा ‘छोड गये मोहे सपनो मे श्याम...’ ही चीज त्यांनी सादर केली. तबल्यावर राजू गुजर, संवादिनीवर श्रीकांत पिसे तर तानपुऱ्यावर मोनिका देशमुख आणि संपदा देगलुरकर हिने कंठसंगत केली. प्रास्ताविक रेणुका देशकर यांनी केले. कलावंतांचे स्वागत नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम सप्तकचे डॉ. उदय गुप्ते, उदय पाटणकर, नितीन सहस्रबुद्धे, मानेकर व सहकाऱ्यांनी आयोजित केला. याप्रसंगी मोठ्या संख्येने रसिकांनी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)