शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
4
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
5
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
6
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
7
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
8
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
9
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
10
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
11
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
12
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
13
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
14
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
15
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
16
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
17
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
18
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

महसूल अधिकारी, पोलिसांना मारहाण

By admin | Updated: May 13, 2014 01:01 IST

नजीकच्या वलनी रेतीघाटात पोकलॅण्डद्वारे रेती उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्याने महसाूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी व पोलीस या रेतीघाटात पाहणी करण्यासाठी गेले.

खापरखेडा : नजीकच्या वलनी रेतीघाटात पोकलॅण्डद्वारे रेती उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्याने महसाूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी व पोलीस या रेतीघाटात पाहणी करण्यासाठी गेले. दरम्यान, रेतीमाफियांनी या कर्मचार्‍यांशी वाद घालून त्यांना धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. विशेष म्हणजे, या या घटनेची तक्रार रविवारी सायंकाळी तहसीलदार रवींद्र माने यांच्या समक्ष खापरखेडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.

वलनी रेतीघाटात पोकलॅण्ड मशीनद्वारे रेतीचे उत्खनन केले जात असल्याची माहिती मिळताच मंडळ अधिकारी प्रकाश हारगुडे, तलाठी राजेश बारापात्रे, कोतवाल नीलेश बोबडे, पोलीस शिपाई हेमंत रंगारी आदी घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी जात होते. त्याचेवेळी या कर्मचार्‍यांना रेती घेऊन येत असलेला एमएच-४0/वाय-१५९५ क्रमांकाचा ट्रक दिसला. या कर्मचार्‍यांना पाहताच ट्रकचालक ट्रक सोडून पळून गेला. कर्मचारी ट्रकचा पंचनामा करीत असताना १२ ते १५ जण हातात शस्त्र घेऊन ट्रकजवळ आले. चार-पाच हस्तकांनी हेमंत रंगारी याच्या हातची काठी हिसकावून त्याला बाजूला नेले व धक्काबुक्की करीत धमकावले. चार-पाच जणांनी राजेश बारापात्रे व नीलेश बोबडे या दोघांना मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. त्याचवेळी रेतीमाफिया येथे पोहोचला. त्याने हारगुडे यांच्याशी ‘सेटलमेंट’ करण्याचा प्रयत्न केला. माफियांनी हा ट्रक रिकामा करून घेऊन गेले. कर्मचारी थेट खापरखेडा पोलीस ठाण्यात आले. या हस्तांकानी कर्मचार्‍यांचा पोलीस ठाण्यापर्यंंंत पाठलाग केला. या कर्मचार्‍यांनी रात्री पाळीवर असलेल्या पोलीस अधिकार्‍याला हकीकत सांगितली. या कर्मचार्‍यांना लेखी तक्रार तयार करण्यास सांगून आपण घटनास्थळी जात असल्याचे सांगून निघून गेले. त्याचवेळी दोन रेतीमाफिया पोलीस ठाण्यात आले व त्यांनी हारगुडे यांच्याशी पुन्हा सेटलमेंट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या कर्मचार्‍यांनी शनिवारी रात्री तक्रार दाखल केली नाही. तहसीलदार माने हे हारगुडे यांच्यासोबत रविवारी पोलीस ठाण्यात आले व तक्रार दाखल केली. या प्रकरणी खापरखेडा भादंवि ३५३, ३७९, ५११, ५0६, ३४ अन्वये ट्रकचालक, मालक व दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)