शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गडकरी वाड्यावर मोर्चा

By admin | Updated: August 22, 2016 02:49 IST

असंघटित क्षेत्रात काम करणारे ५४ लाख सेवानिवृत्त कर्मचारी व भविष्यात निवृत्त होणारे १६ कोटी कर्मचारी यांचा विचार करता,

दहा हजारांवर कर्मचाऱ्यांचा सहभागनागपूर : असंघटित क्षेत्रात काम करणारे ५४ लाख सेवानिवृत्त कर्मचारी व भविष्यात निवृत्त होणारे १६ कोटी कर्मचारी यांचा विचार करता, सरकारने भगतसिंग कोशियारी कमिटीच्या तरतुदी लागू करून ई.पी.एस. ९५ च्या कायद्यात त्वरित सुधारणा करावी, यासाठी देशभरातून नागपुरात एकत्रित झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महालातील वाड्यावर मोर्चा काढला होता. देशभरातील विविध राज्यातून १० हजारावर निवृत्त कर्मचारी चिटणीस पार्क मैदानावर जमले होते. वाढती महागाई आणि खासगी क्षेत्रातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळणारे तुटपुंजे निवृत्ती वेतन ताळमेळच बसत नाही. अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. ई.पी.एस. १९९५ च्या कायद्यात गेल्या २१ वर्षापासून सुधार झालेला नाही. खासगी क्षेत्रातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सरकारने भगतसिंग कोशियारी कमिटीची स्थापना केली होती. परंतु त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय मागण्यासाठी दिल्लीच्या दरबारातही आवाज पोहचविला. निवडणुकीपूर्वी भाजपाच्या नेत्यांनी कोशियारी कमिटीच्या शिफारशी सत्तेत आल्यानंतर ९० दिवसाच्या आत लागू करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. परंतु नेत्यांनी आश्वासनाकडे पाठ फिरविली. रविवारी देशभरातून १० हजारावर कर्मचारी नागपुरात पोहचले. त्यांनी मोर्चा काढला. परंतु पोलिसांनी वाहतुकीच्या दृष्टिकोनातून चिटणीस पार्कमध्ये मोर्चा वळविला. निवृत्त कर्मचारी (१९९५) समन्वय समितीचे अध्यक्ष प्रकाश येंडे व महासचिव प्रकाश पाठक यांच्या नेतृत्वात १० कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने गडकरी यांना निवेदन दिले. गडकरींनी त्यांना समस्या लवकरच सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर चिटणीस पार्कमध्ये सभा घेण्यात आली. सभेला ज्येष्ठ विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे हे उपस्थित होते. अणे म्हणाले की, या कर्मचाऱ्यांचे सरकारकडे हजारो कोटी रुपये जमा आहे. मात्र सरकार पैसे वाटायला बसलेले नाही. त्यासाठी कर्मचाऱ्यांनी दबाव वाढविणे गरजेचे आहे आणि संघर्षाशिवाय ते शक्य नाही. या मेळाव्याला औरंगाबाद जिल्ह्याचे सरचिटणीस अ‍ॅड. सुभाष देवकर यांच्या नेतृत्वात ५५० कर्मचारी उपस्थित झाले होते. (प्रतिनिधी)