शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
5
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
6
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
7
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
8
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
9
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
10
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
11
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
12
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
13
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
14
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
15
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
16
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
17
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
18
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
19
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
20
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांना विविध संघटनांचे निवेदन

By admin | Updated: November 7, 2014 00:44 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच नागपूर दौऱ्यावर येऊन गेले. यादरम्यान विविध संघटनांनी त्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच नागपूर दौऱ्यावर येऊन गेले. यादरम्यान विविध संघटनांनी त्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. उज्ज्वल गोरक्षण ट्रस्टउज्ज्वल गोरक्षण ट्रस्टचे अध्यक्ष जे. पी. शर्मा व संस्थापक अशोक गोयल यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोसेवा आयोगाच्या स्थापनेकरिता निवेदन देण्यात आले. तसेच प्रत्येक जिल्ह्यात गोचर भूमी प्राधिकरण बनविण्याची मागणी त्यांनी केली. या निवेदनात गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान येथे गोहत्या बंदी आहे. मात्र महाराष्ट्रात बैलाची हत्या करणे वैध असल्याने, या कायद्याचा आधार घेत मोठ्या प्रमाणात गोहत्या होत आहे. महाराष्ट्र सरकारने गोमांस निर्यातीवर बंदी आणण्याचीही मागणी ट्रस्टद्वारे करण्यात आली. यावेळी महेंद्र कटारिया, बजरंगलाल मालू, शंकरलाल जालान, कन्हय्यालाल मानधना, पुरुषोत्तम ठाकरे, अशोक खानोरकर, गजानन अंतुरकर, नरेंद्र लाहोटी, पवन जालान आदी उपस्थित होते. पूर्वचे आरटीओ कार्यालय मध्य नागपुरात आणापूर्व नागपुरात सुरू करण्यात आलेले आरटीओ कार्यालय डिप्टी सिग्नल येथे आहे. ते कार्यालय फार दूर असल्याने, नागरिकांना त्रास होत आहे. या कार्यालयाचे परिक्षेत्र कॉटन मार्केट, बजेरिया, महाल, नरेंद्रनगर, बेसा, मानेवाडा, विश्वकर्मानगर, अजनी रेल्वे आहे. त्यामुळे हे आरटीओ कार्यालय मध्य नागपुरात हलवावे, अशी मागणी मोहन कारेमोरे व राजा हिंदुस्थानी यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.त्याचबरोबर महाराष्ट्रातील सिंचन, पीडब्ल्यूडी घोटाळ्यातील आरोपींवर ताबडतोब कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. दिगंबर जैन समाजमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिगंबर जैन समाजातर्फे सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. दिंगबर जैन समाजाचे सतीश जैन पेंढारी, पंकज बोहरा, सुमत लल्ला, जितेंद्र तोरावत, दिलीप राखे, राजेंद्र सिंघवी यांनी मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानावर जाऊन, मुख्यमंत्र्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी उपस्थित आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, सुधाकर देशमुख, अनिल सोले, व जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर यांचाही सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)