शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
5
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
6
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
7
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
8
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
9
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
10
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
11
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
12
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
13
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
14
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
15
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
16
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
17
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
18
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
19
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
20
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मिहानमध्ये वीजदरात लवकरच कपात

By admin | Updated: June 14, 2015 03:02 IST

मिहानमधील उद्योजक विजेच्या दरवाढीने गेल्या तीन महिन्यांपासून हताश आहेत.

नागपूर : मिहानमधील उद्योजक विजेच्या दरवाढीने गेल्या तीन महिन्यांपासून हताश आहेत. वीजदरवाढीचा फटका उद्योगांना बसला असून पुढील आठवड्यात वीजदरात कपात होण्याची माहिती आहे. तीन महिन्यांपासून वाढीव दरात वीजमिहान प्रकल्पातील उद्योजकांना स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देण्यात राज्य सरकारला पुन्हा एकदा अपयश आले आहे. अभिजित कंपनीसोबत करार केला त्यावेळी प्रति युनिट २.९८ रुपये वीज उद्योगांना मिळणार होती. पण करार संपुष्टात आल्यानंतर महावितरणकडून थेट ९ रुपये प्रति युनिट वीज मिळणार होती. पण उद्योजकांनी वीज घेण्यास नकार दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. त्यानंतरच उद्योजकांना ४.३८ रुपये प्रति युनिट दराने वीज मिळू लागली. पण पॉवर एक्स्चेंजमधून वीज खरेदीचे कारण पुढे करून एमएडीसीने वीजदरात वाढ केली आणि प्रति युनिट १.०४ रुपये अतिरिक्त वीजदराचा उद्योजकांवर भार लादला. गेल्या तीन महिन्यांपासून उद्योजकांना प्रति युनिट ५.४२ रुपये दराने विजेचा पुरवठा होत आहे. आता दरकपातीची उद्योजकांना अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)वीजदर कमी होणार!महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे (एमएडीसी) वीज वितरणाचा परवाना आहे. यानुसार वीजखरेदीचा करार करण्यासाठी मे महिन्यात निविदा काढल्या होत्या. चार कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. कमी दरातील निविदा मंजूर करण्यात आली असून बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविली आहे. त्यावर निर्णय झाल्यानंतर महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे. आयोगाने शिक्कामोर्तब केल्यानंतरच वीज खरेदी करून मिहानमधील उद्योजकांना देण्यात येणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून मिहानमधील उद्योजकांना मिळणाऱ्या ५.४२ रुपये दरापेक्षा निश्चितच कमी आणि परवडणारा दर राहील, अशी माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांनी लोकमतशी बोलताना दिली. वीजदर कमी असावेमिहानमधील उद्योगांच्या विकासासाठी विजेचे दर कमी असावे, अशी मागणी आहे. उद्योगासाठी जागेचा करार केला त्यावेळी प्रति युनिट २.९८ दराने वीज मिळणार होती. पण भ्रमनिरास झाला. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने ४.३८ रुपये दराने मिळणाऱ्या विजेचे दर पुन्हा ५.४२ रुपयांवर गेले. अशा अनिश्चिततेमुळे उद्योजकांमध्ये संभ्रम आहे. -मनोहर भोजवानी, अध्यक्ष,मिहान इंडस्ट्रीज असोसिएशन.वीजदरात निश्चितच कपात होणारएमएडीसीने विजेचा पुरवठा करण्यासाठी मे महिन्यात निविदा बोलविल्या होत्या. त्यापैकी कमी वीजदर असलेल्या कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली आहे. नमूद कंपनीतर्फे वीजपुरवठ्यानंतर पुढील आठवड्यापासून वीजदरात निश्चितच कपात होणार आहे. -तानाजी सत्रे, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एमएडीसी.