शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

भूखंडाच्या विकास शुल्कात कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2016 03:11 IST

कष्टाचा एक एक रुपया गोळा करून लोक शहरात भूखंड खरेदी करतात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा : हजारो नागरिकांना फायदानागपूर : कष्टाचा एक एक रुपया गोळा करून लोक शहरात भूखंड खरेदी करतात. मात्र, तो भूखंड नियमित करण्यासाठी नासुप्रमध्ये हजारो रुपये शुल्कापोटी भरावे लागतात. यामुळे त्रस्त झालेल्या नागपूरकरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दिलासा दिला आहे. विकास शुल्काच्या दरात मोठी कपात करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी शनिवारी केली. यामुळे एक हजार चौरस फुटाचा भूखंड नियमित करण्यासाठी सध्याच्या दराच्या तुलनेत आता सुमारे ३५ ते ४० हजार रुपयांची बचत होणार आहे. नागपुरातील हजारो भूखंडधारकांना याचा फायदा होणार आहे.नासुप्रतर्फे शनिवारी दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातील मौजा भामटी, परसोडी व जयताळा येथील नागरिकांसाठी गुंठेवारी नियमित अभिन्यासातील भूखंडांचे नियमितीकरण करण्यासाठी नैैवेद्यम सभागृह येथे शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही घोषणा केली. नासुप्रतर्फे ना विकास क्षेत्र (एनडीझेड) व हरित पट्ट्यातील (ग्रीन बेल्ट) ले-आऊटमधील भूखंड नियमित करण्यासाठी सध्या प्रति चौरस फूट १२० रुपये शुल्क आकारले जाते. यात कपात करून आता प्रति चौरस फूट ७५ रुपये शुल्क आकारले जाईल. तर नियमित ले-आऊटमधील भूखंड नियमित करण्यासाठी सुरुवातीला प्रति चौरस फूट १६ रुपये प्रमाणे शुल्क आकारले जात होते. त्यात वाढ करून प्रति चौरस फूट ५६ रुपये प्रमाणे शुल्क आकारले जात आहे. नासुप्रच्या विश्वस्त मंडळाने दोन महिन्यांपूर्वी या शुल्कात दुप्पट वाढ करून प्रति चौरस फूट ११२ रुपये करण्याचा ठराव मंजूर केला. संबंधित ठराव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यातही दिलासा दिला आहे. नासुप्रने दर दुप्पट करण्याचा प्रस्ताव दिला असला तरी तसे न करता दर दुप्पट ऐवजी दीडपट केले जातील, असे त्यांनी जाहीर केले. यामुळे नियमित ले-आऊटमधील भूखंड नियमित करण्यासाठी ८० ते ८५ रुपये विकास शुल्क आकारले जाईल. मात्र, यासाठी नासुप्रला तसा सुधारित प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी सादर करावा लागणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री ही घोषणा करीत असताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व उपस्थित आमदारांनी संबंधित शुल्क देखील ५६ रुपये करण्यात आल्याची चिठ्ठी मुख्यमंत्र्यांकडे सोपविली. मुख्यमंत्र्यांनी ती वाचूनही दाखविली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी नंतर मला गोंधळवू नका, असे सांगत शुल्क दीडपट होणार असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमानंतर मात्र आमदारांनी संबंधित शुल्क ५६ रुपये करण्याचा ठराव नासुप्रच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत मंजूर करून राज्य सरकारकडे पाठविला जाईल, असे पत्रकारांना सांगितले. तसे झाले तर संबंधित दर ५६ रुपये होऊ शकतो.