शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
2
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
3
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
4
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
5
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
6
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
7
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
8
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
9
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
10
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
11
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
12
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
13
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
14
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
15
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
16
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
17
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
18
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
19
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
20
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनामुळे अडली परिचारिकांची भरती

By admin | Updated: May 9, 2014 02:30 IST

'हेल्थ पोस्ट' साठी ६0 परिचारिकांच्या भरतीचे प्रकरण मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अडले आहे. इतकेच नव्हे तर मनपा आयुक्त श्याम वर्धने यांनी एक वर्ष होऊनही नियुक्ती न झाल्याने ही ....

नागपूर : 'हेल्थ पोस्ट' साठी ६0 परिचारिकांच्या भरतीचे प्रकरण मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अडले आहे. इतकेच नव्हे तर मनपा आयुक्त श्याम वर्धने यांनी एक वर्ष होऊनही नियुक्ती न झाल्याने ही नियुक्ती प्रक्रियाच थांबविण्याची शिफारस केली आहे. संबंधित हेल्थ पोस्ट'मधील डॉक्टर आणि परिचारिकांचे वेतन देण्यास केंद्र सरकार तयार होते. अशा परिस्थितीत जाणीवपूर्वक भरती अडकवून ठेवण्यात आली. या प्रकरणात थेट आयुक्त जबाबदार असल्याचा आरोप करीत त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे नगरसेवक प्रकाश तोतवानी यांनी पत्रपरिषदेद्वारा केली आहे.
तोतवानी यांनी सांगितले की, हेल्थ पोस्टसाठी १५ पैकी १२ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. तीन जागा आरक्षित असल्याने ती पदे भरण्यात आलेली नाही. परिचारिकांची नियुक्ती होऊ न शकल्याने डॉक्टरांचे वेतन महापालिकेलाच द्यावे लागत आहे. २00९ मध्ये हेल्थ पोस्टसाठी जाहिरात काढण्यात आली. मुलाखती झाल्या. १५ डॉक्टर, ६0 नर्स आणि १६ मिडवाईफ नर्सच्या नियुक्तीच्या प्रस्तावास मान्यता मिळाली. २0१0 मध्ये डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली. परंतु परिचारिकांची नियुक्ती मात्र अडकली. परिचारिकांच्या नियुक्तीसाठी २२ एप्रिल २0१२ रोजी मनपा आयुक्तांनी राज्य सरकारला पत्र पाठवून त्यासंदर्भात सूचना मागविल्या. २५ मे २0१२ ला पत्र आले की परिचारिकांची भरती करता येऊ शकते.
२८ सप्टेंबर २0१२ ला मनपा सभागृहात प्रस्तावाला मंजुरी मिळाली. चार महिन्यानंतर अंमलबजावणी करण्याची तयारी झाली. मुलाखती व इतर प्रक्रियाही पार पडल्या. परंतु नियुक्ती मात्र झाली नाही. एक वर्ष उलटल्यानंतर मनपाने पुन्हा १२ मार्च २0१४ ला राज्य सरकारला पत्र पाठविले आणि केलेली नियुक्ती रद्द करण्यात यावी, अशी शिफारस केली आहे. (प्रतिनिधी)
 

यासाठीच मनपाने घेतली माघार
■ प्रशासकीय सूत्रानुसार केंद्र सरकारने संबंधित नियुक्तीला मान्यता दिली आहे. परंतु नंतर त्यात एक अटसुद्धा घातली आहे. त्या अटीनुसार कुटुंब नियोजनामध्ये जे हेल्थ पोस्ट यशस्वी राहतील त्याच डॉक्टर व परिचारिकांच्या वेतनासाठी अनुदान दिले जाईल. ८0 टक्के यशस्वी ठरणार्‍यांना १00 टक्के, ८0 ते ५0 टक्के यशस्वी ठरणार्‍यांना ५0 टक्के आणि त्याखाली राहणार्‍यांना अनुदान मिळणार नाही. यामुळेच मनपा संबंधित नियुक्तीतून माघार घेत आहे.