सहमतीने लैंगिक संबंध ठेवल्यामुळे बलात्काराचा गुन्हा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:07 IST2021-06-29T04:07:22+5:302021-06-29T04:07:22+5:30

नागपूर : फिर्यादी तरुणीने आरोपी तरुणासोबत सहमतीने लैंगिक संबंध ठेवल्याची बाब लक्षात घेता, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बलात्काराचा ...

Rape offense due to consensual sex | सहमतीने लैंगिक संबंध ठेवल्यामुळे बलात्काराचा गुन्हा रद्द

सहमतीने लैंगिक संबंध ठेवल्यामुळे बलात्काराचा गुन्हा रद्द

नागपूर : फिर्यादी तरुणीने आरोपी तरुणासोबत सहमतीने लैंगिक संबंध ठेवल्याची बाब लक्षात घेता, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बलात्काराचा गुन्हा व सत्र न्यायालयात प्रलंबित यासंदर्भातील खटला रद्द केला. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला.

हे प्रकरण भंडारा जिल्ह्यातील आहे. तरुण २२ तर, तरुणी २३ वर्षे वयाची आहे. एकाच महाविद्यालयात शिकत असताना दोघांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, त्यांनी लैंगिक संबंध ठेवले. त्यानंतर तरुणाने लग्न करण्यास नकार दिल्यामुळे, ५ डिसेंबर २०१८ रोजी तरुणीने मोहाडी पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दिली. पुढे त्यांच्यात तडजोड झाली. करिता, त्यांनी हे प्रकरण संपविण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने पोलीस तक्रार तपासली असता, तरुणीने सहमतीने लैंगिक संबंध ठेवल्याचे दिसून आले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा ‘नरिंदर सिंग’ प्रकरणातील निर्णय लक्षात घेता, ही याचिका मंजूर करण्यात आली. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. अनिल ढवस यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Rape offense due to consensual sex