शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाकडे येणारा पाऊस पश्‍चिमेकडे वळला!

By admin | Updated: July 8, 2014 21:57 IST

विदर्भाकडे येणारा हा पाऊस अचानक पश्‍चिमेकडे वळल्याने पुन्हा घोर निराशा झाली आहे.

अकोला : पावसाची चातकासारखी प्रतीक्षा करणार्‍या शेतकर्‍यांना गत आठवड्यात पाऊस प्रणालीने जोर पकडल्याने दिलासा मिळाला होता; परंतु विदर्भाकडे येणारा हा पाऊस अचानक पश्‍चिमेकडे वळल्याने पुन्हा घोर निराशा झाली आहे. असे असले तरी अधूनमधून तुरळक पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तविला आहे. दरम्यान, सार्वत्रिक पावसाचे चित्र येत्या आठवड्यात स्पष्ट होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी पाऊस प्रणालीला वेग आला होता. त्यामुळे मध्य प्रदेशात चांगला पाऊस बरसला. तथापि, विदर्भाकडे येणार्‍या पावसावर अर्थात पाऊस प्रणालीवर प्रतिकूल परिणाम झाल्यामुळे हा पाऊस पश्‍चिमेकडे वळला. आता जे ढगाळ वातावरण तयार झालेले आहे. हे पावसाचे ढग नाहीत. त्यामुळे आता पाऊस घेऊन येणार्‍या ढगांची सर्वांना प्रतीक्षा आहे. ओडिशा, छत्तीसगड आदी भागात चांगला पाऊस झाला, तर मात्र विदर्भात तो पाऊस येण्याची शक्यता असते. आपल्याकडे येणारा पाऊस हा पश्‍चिम बंगालच्या उपसागराकडून येणारा असल्यामुळे आपले सर्व लक्ष या भागातील पडणार्‍या पावसाकडे लागून आहे. हे चित्र तीन दिवसानंतर अधिक स्पष्ट होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे आमचे सर्व लक्ष आता पश्‍चिम बंगालच्या उपसागराकडून सशक्तपणे तयार होणार्‍या पाऊस प्रणालीकडे लागले असल्याचे वेधशाळेच्या हवामान शास्त्रज्ञांनी सांगितले. दरम्यान, आंतरराष्ट्रीय हवामान केंद्राने येत्या १२ व १३ जुलैला पाऊस येण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता या तारखांकडे लागले आहे.