शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सुरू असलेल्या हॉटेल, कॅफेवर छापे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 21:20 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाचा मनाई आदेश असूनही खाद्यपदार्थ विक्री करण्यासाठी आस्थापना सुरू ठेवणाऱ्या हॉटेल, कॅफेत बजाजनगर पोलिसांनी गुरुवारी, शुक्रवारी छापे घातले.

ठळक मुद्देबजाजनगर पोलिसांची कारवाई : ऑनलाईनच्या नावाखाली दुकानदारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाचा मनाई आदेश असूनही खाद्यपदार्थ विक्री करण्यासाठी आस्थापना सुरू ठेवणाऱ्या हॉटेल, कॅफेत बजाजनगर पोलिसांनी गुरुवारी, शुक्रवारी छापे घातले. २४ तासात तीन ठिकाणी पोलिसांनी कारवाई केल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.नागरिकांनी कुठेच गर्दी करू नये, गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, हे ध्यानात घेऊन राज्य सरकारने ठिकठिकाणचे मॉल्स, हॉटेल्स, जीम, जलतरण तलाव तसेच जेथे गर्दी होते, अशा चहा टपरीपासून पान टपरीपर्यंतची सर्व आस्थापना (दुकाने) बंद करण्याचे आदेश दिले. नागपुरात जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश जारी केला असून, पोलिसांनी कलम १४४ जारी केले आहे. असे असूनही बजाजनगरातील कोतवालनगरात असलेले द ब्रेड बॉक्स आणि तात्या टोपेनगरात असलेले सुलभ फरसाण अ‍ॅण्ड फॅमिली फूड सुरु असल्याची माहिती पोलिसांना कळली. त्यावरून बजाजनगरचे ठाणेदार राघवेंद्र क्षीरसागर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या दोन्ही ठिकाणी गुुरुवारी रात्री छापे घातले. मनाई असताना हॉटेल सुरू ठेवल्याबद्दल ब्रेड बॉक्सचे संचालक चैतन्य लेले आणि फॅमिली फूडचे संचालक महेश मुनेश्वर या दोघांविरुद्ध कलम १८८ अन्वये कारवाई केली.ऑनलाईन ऑर्डर त्याच प्रमाणे शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास लक्ष्मीनगरातील ग्रीन पिझ्झा नामक रेस्टॉरंटमध्ये पोलिसांनी छापा घातला. येथेही खाद्यपदार्थ तयार करताना कर्मचारी आढळले. ऑनलाईन ऑर्डर देण्यासाठी खाद्यपदार्थ तयार केले जात असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. यावेळी ऑर्डरच्या पावत्याही कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दाखविल्या. मात्र, मनाई असताना हॉटेल सुरू ठेवल्याबद्दल ग्रीन पिझ्झाचे संचालक शरद राठी यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याraidधाडhotelहॉटेल