शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

कळमन्यात आरामशीनला भीषण आग

By admin | Updated: May 8, 2014 02:38 IST

कापसी (कळमना) येथील एका आरामशीनला भीषण आग लागून सुमारे १३ कोटी रुपयांचे लाकूड जळून भस्म झाले. आज पहाटे २ वाजता ही भीषण आग लागली.

१३ कोटींचे नुकसान : सुदैवाने प्राणहानी टळली

नागपूर : कापसी (कळमना) येथील एका आरामशीनला भीषण आग लागून सुमारे १३ कोटी रुपयांचे लाकूड जळून भस्म झाले. आज पहाटे २ वाजता ही भीषण आग लागली. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी आपल्या दोन डझन जवानांसह नऊ बंबांच्या साहाय्याने निरंतर प्रयत्नरत आहेत. मात्र, १२ तास होऊनही आग विझविण्यात त्यांना यश आले नाही. यावरून आगीची भीषणता लक्षात यावी.
भंडारा मार्गावरील कापसी (खुर्द) येथे फ्रेण्डस टिंबर प्रा. लि. या कंपनीत ही आरामशीन आहे.
समीर जयस्वाल, पुनित कोहली यांच्या मालकीच्या या आरामशीन मधून आयातीत लाकडासह (इम्पोर्टेड वूड) सर्वच प्रकारचे महागड्या लाकडाची खरेदी, विक्री अन् कटाईचे काम केले जाते. येथील इम्पोर्टेड टी वूड, सॉन, टिंबरसह कोट्यवधींचे कटसाईज ठिकठिकाणी पाठविले जातात. सुमारे २५ हजार चौरस फुटात आरामशीनचे वेअर हाऊस आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत सर्व कामकाज आटोपल्यानंतर जयस्वाल आणि कोहली कार्यालय बंद करून निघून गेले. पहाटे २ च्या सुमारास वेअर हाऊसमधील शेडमधून धूर निघताना दिसल्याने चौकीदाराने तिकडे धाव घेतली. यावेळी त्याला आग लागल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी जयस्वाल आणि कोहली यांना फोन करून ही माहिती दिली. अग्निशमन दल आणि पोलिसांनाही कळविण्यात आले. सुमारे अर्धा तास विलंबाने अग्निशमन दलाचे जवान बंबासह घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. त्यामुळे अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, लकडगंजचे स्टेशन ऑफिसर भीमराव चंदनखेडे, कळमना अनिल बरडे, सदाशिव भेंडे, प्रेमराज बरडे यांच्यासह ४0 ते ५0 अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी एकापाठोपाठ तब्बल नऊ बंब घटनास्थळी बोलवून घेतले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कसोशीचे प्रयत्न केले. मात्र, सर्वत्र लाकडाचा पसारा असल्याने आग विझण्याऐवजी अधिकच भीषण होत गेली. आरामशीनमध्ये किमती लाकूड ठेवण्यासाठी एक मोठे टिनाचे शेड करण्यात आले होते. हे शेड खाली पडून पुरते खाक झाले.
यंत्रणेची धावपळ
या भीषण आगीमुळे अग्निशमन दलाची मोठी धावपळ झाली. पाण्याचा सारखा मारा करूनही आग विझता विझेना. त्यामुळे पहिल्या दोन तासातच ४ ते ५ टँकर रिकामे झाले. त्यात पाणी भरण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी आजूबाजूच्या विहिरी, तलावांवर धाव घेतली. मात्र, पहाटेची वेळ असल्यामुळे टँकरमध्ये पाणी भरणे जमले नाही. शेवटी चार ते पाच किलोमीटर दूर अंतरावरून (नेहमीच्या ठिकाणावरून) अग्निशमन दलाच्या जवानांनी टँकर भरून आणले. ८0 ते ९0 फेर्‍या पाणी आणल्यानंतरही आगीवर नियंत्रण मिळवण्यात यंत्रणेला यश आले नव्हते. दुसरीकडे पाणी आणण्यास विलंब झाल्यामुळे आग अधिकच भडकली.
अनेक मान्यवरांची भेट
आगीची माहिती कळताच अनेक मान्यवरांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यात महापौर प्रा. अनिल सोले यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता. वृत्त लिहिस्तोवर आगीचे कारण कळू शकले नाही. (प्रतिनिधी)