शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राधा माधव डेव्हलपर्सला ग्राहक आयोगाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:18 IST

नागपूर : संत्रानगरीतील राधा माधव डेव्हलपर्सला अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा जोरदार दणका बसला आहे. तक्रारकर्त्या ग्राहकाचे १० ...

नागपूर : संत्रानगरीतील राधा माधव डेव्हलपर्सला अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा जोरदार दणका बसला आहे. तक्रारकर्त्या ग्राहकाचे १० लाख ६६ हजार २४२ रुपये १८ टक्के व्याजासह परत करावे, असा आदेश आयोगाने राधा माधव डेव्हलपर्सला दिला आहे. तसेच, तक्रारकर्त्या ग्राहकास शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १ लाख व तक्रार खर्चापाेटी १० हजार रुपये भरपाई मंजूर केले आहेत. ही रक्कम डेव्हलपर्सनेच द्यायची आहे.

विक्रांत उपाध्याय असे तक्रारकर्त्या ग्राहकाचे नाव असून, त्यांची तक्रार आयोगाच्या पीठासीन सदस्य स्मिता चांदेकर व सदस्य अविनाश प्रभूणे यांनी निकाली काढली. संबंधित व्याज २८ नोव्हेंबर २०१५ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले आहे. तसेच, या आदेशाचे ३० दिवसांत पालन करण्यात अपयश आल्यास त्यापुढे रोज १०० रुपये नुकसानभरपाई लागू होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तक्रारीतील माहितीनुसार, उपाध्याय यांनी राधा माधव डेव्हलपर्सच्या मौजा जामठा येथील ‘वृंदावन देवकी’ योजनेतील एक रो-हाऊस २२ लाख ९९ हजार रुपयांत खरेदी करण्‍यासाठी २८ डिसेंबर २०१३ रोजी करार केला होता. त्यानंतर डेव्हलपरला वेळोवेळी एकूण १३ लाख २६ हजार २४२ रुपये अदा केले. ३१ जुलै २०१५ रोजी डेव्हलपरने त्यांना वाटप पत्र दिले, पण विक्रीपत्र करून दिले नाही. त्यामुळे उपाध्याय यांनी करार रद्द करून सर्व रक्कम परत मागितली असता, त्यांना केवळ २ लाख ६० हजार रुपये परत करण्यात आले. उर्वरित १० लाख ६६ हजार २४२ रुपये देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी ग्राहक आयोगात धाव घेतली होती. आयोगाची नोटीस मिळाल्यानंतर डेव्हलपरने लेखी उत्तर सादर केले व विविध मुद्दयांवर स्पष्टीकरण देऊन उपाध्याय यांचे आरोप फेटाळून लावले. तसेच, तक्रार खारीज करण्याची मागणी केली. आयोगाने अंतिम सुनावणीनंतर विविध बाबी लक्षात घेता हा निर्णय दिला.

---------------------

डेव्हलपरचे आक्षेप फेटाळले

प्रकरणातील सर्व वस्तुस्थितीचा विचार करता डेव्हलपरची संपूर्ण कृती ही सेवेतील त्रुटी व अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब दर्शविते. त्यामुळे डेव्हलपरचे सर्व आक्षेप फेटाळण्यात येतात, असे आयोगाने नमूद केले. उभय पक्षातील करार रद्द झाल्यानंतर डेव्हलपरने तक्रारकर्त्‍याकडून स्वीकारलेली रक्कम आजतागायत परत केली नाही. या बाबीचा विचार करता तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशत: मंजूर होण्यास पात्र असल्याचे मतही आयोगाने व्यक्त केले.