कव्वाली व सुफी गीतांची संगीत मैफिल

By Admin | Updated: May 23, 2014 00:56 IST2014-05-23T00:56:40+5:302014-05-23T00:56:40+5:30

स्वरतरंग म्युझिक अकादमीतर्फे गुरुवारी सुफी रचना व भन्नाट कव्वाली गीतांच्या ‘एक शाम कव्वाली और सुफी नगमो के नाम’ या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते.

Qawwali and Sufi music concert | कव्वाली व सुफी गीतांची संगीत मैफिल

कव्वाली व सुफी गीतांची संगीत मैफिल

नागपूर : स्वरतरंग म्युझिक अकादमीतर्फे गुरुवारी सुफी रचना व भन्नाट कव्वाली गीतांच्या ‘एक शाम कव्वाली और सुफी नगमो के नाम’ या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाची संकल्पना संस्थेचे संचालक निरंजन बोबडे यांची होती. झी. टीव्ही फेम निरंजन बोबडे व श्रीनिधी घटाटे यांच्यासह नवोदित गायिका इनू मुजूमदार, श्रेया खराबे, गौरी गायकवाड, सुनील लघाटे व दिनेश कव्वाल यांनी जुन्या-नवीन १९ गीतांचा श्रवणीय नजराणा सादर केला. निरंजन बोबडे यांनी ‘पिया हाजी अली.., मौला मौला..., ’ व ‘हे लंबोदर गजमुख..’ या भावपूर्ण रचनांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर ‘परदा है परदा..., लगी तुमसे मन की लगन..., ’ या रचनांसह ‘है अगर दुश्मन जमाना..., पल दो पल का साथ...’ या निरंजन, श्रेया व श्रीनिधी यांच्या युगुल गीतांनी मैफिलीत वेगळाच रंग भरला. श्रीनिधीने ‘तेरे लिये मेरा इश्क सुफियाना..’ हे गीत खास शैलीत सादर केले. तसेच दिनेशने ‘चढता सूरज धीरे धीरे...,’ गौरीने ‘अगर दिलबर की रुसवाई, ’ सुनीलने ‘हाल क्या है दिलोका...’ इनूने ‘मोरे अंगना...’ अशा गीतांचे सादरीकरण केले. कार्यक्रमात वाद्य कलाकार म्हणून श्रीकांत सूर्यवंशी (तबला), सुभाष वानखेडे (आॅक्टोपॅड), महेंद्र ढोले, पवन मानवटकर (की बोर्ड), पंकज यादव (ढोलक), रघुनंदन परसतवार (कांगो), रिंकू निखारे, प्रसन्ना वानखेडे (गिटार) यांनी साथ दिली. कार्यक्रमाला जे. के. मुजूमदार व ज्येष्ठ गायक रघुनाथ बोबडे प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Qawwali and Sufi music concert