शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ताकराचा भार वाढणार

By admin | Updated: February 22, 2015 02:37 IST

महापालिकेची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी कर व कर आकारणी विभाग मालमत्ता करात वाढ करणार आहे. प्रशासन व सत्तापक्षाने याला आधीच हिरवी झेंडी दिली असल्याने

नागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी कर व कर आकारणी विभाग मालमत्ता करात वाढ करणार आहे. प्रशासन व सत्तापक्षाने याला आधीच हिरवी झेंडी दिली असल्याने शहरातील मालमत्ताधारकांना वाढीव कराचा भार सोसावा लागणार आहे. शनिवारी मनपाच्या महाल येथील टाऊ न हॉल येथे आयोजित चर्चासत्रात नवीन कर पद्धतीचे सादरीकरण करण्यात आले. ७५ नगरसेवक उपस्थित होते. यात सत्तापक्षासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा सदस्यांनी सूचना मांडल्या. योग्य सूचनांचा स्वीकार करून नवीन कर आकारणीची पद्धती अधिक सूकर करण्यात येईल. एप्रिल २०१५ पासून ही पद्धती अमलात आणली जाणार असल्याची माहिती कर व कर आकारणी समितीचे अध्यक्ष गिरीश देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.मालमत्ता कोणत्या भागात आहे. बांधकामाची गुणवत्ता, भवनाचे आयुष्य, वापर व मालकी आदी बाबींचा विचार क रून विविध गटात विभागणी केली जाईल. नवीन धोरणानुसार कर आकारणी करताना भाडेकरू ठेवणाऱ्यांना सवलत देण्यात आली आहे. २० फेब्रुवारीपर्यत मालमत्ता करापासून १६०.६७ कोटींची वसुली झाली. गेल्या वर्षाच्या तुलनेत ती १७.९८ कोटींनी अधिक आहे. विभागाला २२५ कोटींच्या वसुलीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. एलबीटी पासून ३३२.६२ कोटींचा महसूल जमा झाला आहे. मुद्रांक शुल्कातून २५ क ोटी प्राप्त झाले असून २८ कोटी येणे आहे. (प्रतिनिधी)