शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहात वरिष्ठांची प्रदीर्घ चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2015 03:04 IST

कारागृह उपमहानिरीक्षकाचे (डीआयजी) पद रिक्त असल्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे शुक्रवारी नागपुरात आले.

मिशन याकूब : डीआयजी आणि एसपीची व्यूहरचनानागपूर : कारागृह उपमहानिरीक्षकाचे (डीआयजी) पद रिक्त असल्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे शुक्रवारी नागपुरात आले. अधीक्षक योगेश देसाई यांच्यासोबत त्यांनी दिवसभर कारागृहातील परिस्थितीचे अवलोकन करून प्रदीर्घ बैठक केली. याकूब मेमनच्या फाशीच्या तयारीची ही बैठक होती, असे समजते. कारागृह महानिरीक्षक मीरा बोरवणकर शनिवारी सकाळी मध्यवर्ती कारागृहाला भेट देणार आहेत.‘जेल ब्रेक‘ नंतर कारागृहातील वातावरण ढवळून निघाले होते. पाच अधिकारी आणि सहा कर्मचाऱ्यांच्या निलंबनानंतर उपमहानिरीक्षक शशिकांत शिंदे यांच्यासह दोन डझन अधिकारी-कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली. त्यानंतर येथे उपमहानिरीक्षक म्हणून स्वाती साठे तर योगेश देसाई यांच्याकडे अधीक्षक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. हे अधिकारी कारागृहातील वातावरण सुरळीत करण्याचे प्रयत्न करीत असतानाच येथे बंदिस्त असलेला याकूब अब्दुल रज्जाक मेमन याचा डेथ वॉरंट निघाला. त्यामुळे नागपूरचे मध्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा देश-विदेशात चर्चेत आले. याकूबला फाशी देण्याची तयारी सुरू असतानाच बुधवारी सायंकाळी स्वाती साठे यांनी आपला प्रभार सोडून ती सूत्रे अधीक्षक योगेश देसाई यांना सोपविली. यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले. लोकमतने या संबंधाचे वृत्त आज ठळकपणे प्रकाशित केले. या पार्श्वभूमीवर, उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे (उपमहानिरीक्षक) शुक्रवारी येथील मध्यवर्ती कारागृहात दाखल झाले. स्वाती साठे यांनी सोडलेला नागपूर कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा प्रभार त्यांना सोपविण्यात येणार असल्याची चर्चा असतानाच रात्री दुसरेच वृत्त आले. धामणे यांना पदभार स्वीकारण्यासाठी नव्हे तर अधीक्षक देसाई यांना मदत करण्यासाठी येथे पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्याचमुळे धामणे यांनी देसाई यांच्यासोबत आज दिवसभर कारागृहाचे निरीक्षण करून स्थिती जाणून घेतली. त्यांच्यासोबत महत्त्वाची बैठक झाली, मात्र ते डीआयजींचा प्रभार स्वीकारण्यासाठी आले नव्हते, असे देसाई यांनी रात्री लोकमतशी बोलताना सांगितले. दरम्यान, महानिरीक्षक बोरवणकर शुक्रवारी रात्री नागपुरात आल्या. वारंवार संपर्क करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शनिवारी सकाळी त्या कारागृहास भेट देणार आहेत.(प्रतिनिधी)