शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

नासुप्रचे अधिकार संपुष्टात आणण्याची प्रक्रि या सुरू

By admin | Updated: September 7, 2016 02:51 IST

नागपूर शहरातील नागपूर सुधार प्रन्यास(नासुप्र)च्या अधिकार क्षेत्रातील सात योजना व गुंठेवारी योजनेंतर्गत असलेले

नगरविकास विभागाकडून पत्र : दोन समित्या गठित करणारनागपूर : नागपूर शहरातील नागपूर सुधार प्रन्यास(नासुप्र)च्या अधिकार क्षेत्रातील सात योजना व गुंठेवारी योजनेंतर्गत असलेले अभिन्यास महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या अनुषंगाने शासनस्तरावर कारवाई सुरू करण्यात आली आहे.नासुप्रच्या अधिनियमातील तरतुदीनुसार असलेल्या योजनांची सविस्तर व अद्ययावत माहिती, तसेच त्याबाबतची कागदपत्रे, कायद्यातील तरतुदीनुसार अभिप्राय, सदरच्या योजना हस्तांतरणामुळे होणारे परिणाम याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश नगरविकास विभागाने नासुप्रला दिले आहे. मंगळवारी याबाबतचे पत्र मिळाल्याची माहिती सभापती दीपक म्हैसेकर यांनी दिली. नागपूर शहरात महानगरपालिका व नासुप्र अशा दोन विकास संस्था असल्याने विकासासंदर्भात निर्णय घेताना अनेकदा अडचणी निर्माण होत होत्या. नासुप्रच्या कामकाजाविषयी नागरिकांत असंतोष आहे. याची दखल घेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नासुप्रचे शहरातील अधिकार संपुष्टात आणण्याची घोषणा केली होती. यावर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. त्यानुसार नगरविकास विभागाने नासुप्रला हे पत्र पाठविले आहे. नासुप्रच्या माध्यमातून शहरात विविध विकास योजना राबविल्या जात आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी ५० हजार घरे, पोलीस हाऊ सिंग योजना, सक्करदरा व फुटाळा तलावाचे सौंदर्यीकरण, हजरतबाबा ताजुद्दीन दर्ग्याचे सौंदर्यीकरण व विकास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन फाऊं डेशन सेंटर, समाजकल्याण विभागाचे वसतिगृह, उद्यान विकास व सौंदर्यीकरण, सांस्कृतिक व व्यापारी संकुल, गृहबांधणी प्रकल्प, अभिन्यासातील विकास कामे, आदींचा यात समावेश आहे. ही जबाबदारी महानगरपालिकेकडे सोपविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.(प्रतिनिधी)तांत्रिक समिती तांत्रिक समितीत महानगरपालिकेचे मुख्य अभियंता, नासुप्रचे अधीक्षक अभियंता तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांचा या समितीत समावेश राहणार आहेत. शासनाचा निर्णयनागपूर शहरातील नासुप्रचे अधिकार संपुष्टात आणून ते महानगरपालिकेकडे हस्तांतरित क रण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय व तांत्रिक अशा दोन समित्या गठित केल्या जाणार आहेत.