शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
5
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
6
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
7
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
8
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
9
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
10
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
11
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
13
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
14
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
15
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
16
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
17
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
18
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
19
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील २४०० गुन्हेगारांवर होणार प्रतिबंधात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 22:08 IST

गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. यासाठी २४०० गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. यात शहरातील १२०० व ग्रामीण भागातील १२०० गुन्हेगारांचा समावेश आहे.

ठळक मुद्देविधानसभा निवडणुकीसाठी पोलिसही सज्ज : १० हजारावर पोलीस बंदोबस्तासाठी तैनात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशसनासोबतच पोलीस विभागानेही कंबर कसली आहे. जिल्ह्यात सुमारे १० हजारावर पोलीस अधिकारी-कर्मचारी निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात येतील. यासोबतच निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. यासाठी २४०० गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. यात शहरातील १२०० व ग्रामीण भागातील १२०० गुन्हेगारांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पत्रपरिषदेत दिली.पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सांगितले की, जानेवारीपासून आतापर्यंत शहरात जवळपास ५,६०० गुन्हेगारांविरुद्ध विविध कलमांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी १२०० गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल. यासोबतच अवैध दारू तस्करीविरुद्ध कारवाई करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष पथकही स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येक झोननिहाय टीम तयार करण्यात आली आहे. निवडणूक शंततेत पार पाडण्यासाठी पोलीस पूर्णपणे सज्ज आहेत.पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले की, जिल्ह्याला लागून छत्तीसगड आणि मध्य प्रदेश राज्याची सीमा आहे. निवडणूक काळात अवैध दारू व पैशाची वाहतूक होऊ नये, यावर लक्ष ठेवण्यात येईल. या दोन्ही राज्यातून नागपुरात दाखल होण्यासाठी एकूण १० मार्ग आहेत. त्यावर पोलिसांचे चेक पोस्ट तयार करण्यात येईल, यासाठी स्पेश्ल स्क्वॉड तैनात केले जाईल. ग्रामीण भागात जानेवारीपासून आतापर्यंत ४,७८८गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी १२०० गुन्हेगारांची यादी तयार केली असून, येत्या काही दिवसात त्यांच्याविरुद्धही प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल. शस्त्र जप्तीची कारवाईसुद्धा सुरू केली जाईल.पोलीस बंदोबस्त (शहर)३६०० पोलीस कर्मचारी५०० अधिकारी१५०० होमगार्डनिमलष्करी दलाच्या दोन कंपनीपोलीस बंदोबस्त (ग्रामीण)२२५० पोलीस कर्मचारी१५० अधिकारी५५० होमगार्डनिमलष्करी दलाच्या चार कंपनीची मागणीशहरात २८ संवेदनशील बूथपोलीस विभागानुसार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील २८ संवेदनशील बूथ आहेत. यावर पोलिसांचा विशेष बंदोबस्त ठेवण्यात येईल.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Policeपोलिस