नागपुरात होणार ‘चाणक्य’चे सादरीकरण

By Admin | Updated: October 23, 2016 02:46 IST2016-10-23T02:46:26+5:302016-10-23T02:46:26+5:30

लोकमत समाचारतर्फे आयोजित ऐतिहासिक हिंदी नाटक ‘चाणक्य’चे २७ आॅक्टोबर रोजी सादरीकरण होणार आहे.

Presentation of 'Chanakya' will be held in Nagpur | नागपुरात होणार ‘चाणक्य’चे सादरीकरण

नागपुरात होणार ‘चाणक्य’चे सादरीकरण

लोकमत समाचारचे आयोजन : मनोज जोशी अभिनित ऐतिहासिक नाटक २७ रोजी
नागपूर : लोकमत समाचारतर्फे आयोजित ऐतिहासिक हिंदी नाटक ‘चाणक्य’चे २७ आॅक्टोबर रोजी सादरीकरण होणार आहे. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात रात्री ८ वाजता आयोजित या नाटकाचे प्रवेशपत्र मिळविण्यासाठी वाचकांमध्ये जणू स्पर्धा लागली आहे. लोकमत समाचार हे हिंदी वृत्तपत्र शहरात पहिल्या कमांकावर आहे.
याचा आनंद साजरा करण्यासाठी या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. या नाटकाला घेऊन वाचकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. व्हॉटस्अप, ई-मेल, मोबाईल मेसेजेस आणि फोन कॉल्स करून प्रवेशपत्रबाबत सातत्याने विचारणा केली जात आहे. आपले कुटुंब आणि मित्रांनाही हे नाटक पाहता यावे, यासाठी अनेक वाचक प्रयत्न करीत आहेत. यंदा २५ वर्षे पूर्ण करणाऱ्या या नाटकाचे मुख्य पात्र प्रसिद्ध अभिनेता मनोज जोशी साकारत आहेत.

Web Title: Presentation of 'Chanakya' will be held in Nagpur