शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

By admin | Updated: June 7, 2015 02:54 IST

दिवसभर ढगांच्या लपाछपीचा खेळ सुरू होता. कडक ऊन आणि सावलीमुळे झालेल्या गर्मीने नागरिक त्रस्त झाले होते.

नागपूर : दिवसभर ढगांच्या लपाछपीचा खेळ सुरू होता. कडक ऊन आणि सावलीमुळे झालेल्या गर्मीने नागरिक त्रस्त झाले होते. परंतु शनिवारी रात्री ९.३० च्या दरम्यान अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. ४५ मिनिटे जोरदार पाऊस पडला. त्यानंतर हलक्या पावसाच्या सरी सुरू होत्या. त्यामुळे हा मान्सूनपूर्व पाऊस असल्याचे मानण्यात येत आहे. चार दिवसांच्या विलंबानंतर केरळात दक्षिण-पश्चिम मान्सूनने शुक्रवारी हजेरी लावली. त्यासोबतच विदर्भात मान्सूनच्या पावसाची वाट पाहणे सुरू झाले. हवामान तज्ज्ञांच्या मते ४८ तासात मान्सून पुढे सरकत १० ते १५ जूनपर्यंत विदर्भात पोहोचण्याची चिन्ह दिसत आहेत. सध्या मान्सून अरबी सागर, लक्षद्वीप, केरळा, कर्नाटक, तामिळनाडुच्या काही भागात पोहोचला आहे. विदर्भात १० जूनला मान्सून पोहोचण्याची तारीख ठरविण्यात आली आहे. यावेळी केरळात मान्सून उशिरा पोहोचल्यामुळे नागपुरातही तो १५ ते २० जूनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. मागील दहा वर्षात ६ ते २० जून दरम्यान मान्सूनचे आगमन झाले होते. आज ज्या पद्धतीने पावसाने हजेरी लावली, त्याकडे पाहून पावसाळ्यात चांगला पाऊस पडण्याची आशा नागरिकांना आहे. शनिवारी सकाळी आकाशात ढग जमा झाले होते. मध्येच ऊन पडत होते. दुपारच्या वेळी गर्मीत वाढ झाली होती. कमाल तापमान ४२.४ अंश सेल्सियसवर पोहोचले होते. परंतु रात्री पाऊस पडल्यामुळे वातावरण आल्हाददायक झाले. (प्रतिनिधी)