शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

पोक्सोत वडिलाला पाच वर्षे कारावास

By admin | Updated: June 21, 2016 02:46 IST

बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा (पोक्सो) च्या विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश पी. व्ही. गणेडीवाला यांच्या

नागपूर : बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा (पोक्सो) च्या विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश पी. व्ही. गणेडीवाला यांच्या न्यायालयाने खुद्द आरोपी वडिलाला पाच वर्षे सश्रम कारावासची शिक्षा सुनावली.अजय हरिश्चंद्र ढेंगरे (४२) , असे आरोपचे नाव असून तो काटोल येथील रहिवासी आहे. घटनेच्या वेळी तो पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत वैशालीनगर येथे राहायचा. पीडित मुलगी ही लहानपणापासूनच आपल्या मामाकडे राहात होती. घटनेच्या दोन वर्षांपूर्वीपासून ती पुन्हा आपल्या आई-वडिलांकडे राहू लागली होती. ती अकराव्या वर्गात शिकत होती. दुर्दैवी रात्री ९ आॅगस्ट २०१६ रोजी ती घरात झोपलेली असताना अजयने तिचा विनयभंग केला होता. १५ आॅगस्ट रोजी याच कारणांवरून तिला मारहाण केली होती. वारंवार तो तिला धमक्याही देत होता. भयग्रस्त होऊन ती आपल्या मावशीकडे राहण्यासाठी गेली असता तेथेही त्याने मारहाण केली होती. पीडित मुलीने चाईल्ड लाईनच्या मार्फत पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवताच भादंविच्या ३५४, ३२३, ५०४ आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याच्या ७, ८ कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी पित्याला अटक करण्यात आली होती. पीडित मुलीला शासकीय वसतिगृहात ठेवण्यात आले होते. पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार केंचे यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात सरकारच्या वतीने चार आणि बचाव पक्षाच्या वतीने दोन साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने आरोपी पित्याला पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील संगीता पवार यांनी तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. घिरडे यांनी काम पाहिले. हेड कॉन्स्टेबल सुरेश शेंडे यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. (प्रतिनिधी)