शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सिव्हील लाइन्समध्ये दर रविवारी दिसतो ‘स्वच्छता दूत’;  डॉक्टरांची अनोखी मोहिम : शहर स्वच्छतेचा संकल्प 

By गणेश हुड | Updated: November 20, 2025 21:16 IST

रविवारी सकाळी  डॉ. निर्भय  स्वच्छतेच्या सेवेला सुरुवात करतात. सिव्हील लाइन्समधील बोले पेट्रोल पंप ते तिरपुडे महाविद्यालयापर्यंत १०० मीटर परिसरातील कचरा उचलतात.

- गणेश हूड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रविवारची निवांत सकाळ… बहुतेक जण अजूनही आळस झटकत घरात असतात. पण सिव्हील लाइन्समध्ये मात्र दर रविवारी एक वेगळीच चाहूल लागते. हातात ग्लोव्हज, कचरा उचलण्याची काठी आणि एक पिशवी घेऊन एक व्यक्ती शांतपणे रस्त्याकडेला पडलेला कचरा गोळा करताना दिसते. कोणतंही कौतुक नको, फोटो नाही, व्हिडिओ नाही… फक्त शहराची स्वच्छता आणि नागपूरप्रती असलेला निःस्वार्थ भाव.ही व्यक्ती म्हणजे मध्य रेल्वेमध्ये कार्यरत डॉ. कुमार निर्भय. पेशाने डॉक्टर आहेत. पण  ‘स्वच्छतादूत’ बनले आहेत.

रविवारी सकाळी  डॉ. निर्भय  स्वच्छतेच्या सेवेला सुरुवात करतात. सिव्हील लाइन्समधील बोले पेट्रोल पंप ते तिरपुडे महाविद्यालयापर्यंत १०० मीटर परिसरातील कचरा उचलतात. रस्त्याच्या कडेला पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, फुटलेल्या काचा, बहुतेक लोक ज्या कचऱ्याकडे दुर्लक्ष करतात, तोच कचरा ते दर आठवड्याला एकट्याने गोळा करून कचराकुंडीत टाकतात.त्यांच्या कृतीने विद्यार्थ्यांनाही प्रेरणाडॉ. निर्भय यांची शांत पण प्रभावी कृती पाहून काही महाविद्यालयीन विद्यार्थीही या मोहिमेत सामील होत आहेत.आपल्या घराजवळील रस्ते किमान आठवड्यातून एकदा स्वच्छ करा, या त्यांच्या आवाहनाला विद्यार्थ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.आपल्या परिसरातील रस्त्यावरचा कचरा वेचून स्वच्छ नागपूर मोहिमेला हातभार लावत आहेत.स्वच्छता ही जबाबदारी प्रत्येकाची — डॉ. कुमार निर्भयशहर स्वच्छ ठेवणे हे फक्त महानगरपालिकेचे काम नाही; हा प्रत्येक नागरिकाचा कर्तव्यभाव आहे.प्रत्येकाने दर रविवारी फक्त १०० मीटर परिसरातील कचरा उचलण्याचा संकल्प केला, तर नागपूर भारतातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक होऊ शकते, असे डॉ. निर्भय यांनी सांगितले. महापालिकेकडून गौरव ;अनुकरणीय उपक्रम डॉ. निर्भय यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे.हे काम प्रशंसनीय आणि अनुकरणीय आहे. शहर स्वच्छतेच्या उद्दिष्टासाठी अशा नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने थोडा वेळ दिला, तर शहर स्वच्छ होण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही.नागरिकांनीही दर रविवारी १०० मीटर कचरा उचलण्याच्या उतक्रमात सहभागी व्हावे.-डॉ.अभिजीत चौधरी ,मनपा आयुक्त

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur Doctor's Sunday Clean-Up Drive: A Civil Lines Inspiration

Web Summary : Dr. Kumar Nirbhay dedicates Sundays to cleaning Nagpur's Civil Lines, inspiring students. He urges citizens to contribute by cleaning 100 meters weekly, emphasizing shared responsibility for a cleaner city. The municipal commissioner has lauded his initiative.
टॅग्स :nagpurनागपूर