शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

‘आधार’च्या हलगर्जीपणाची ‘आरटीआय’तून ‘पोलखोल’

By admin | Updated: March 7, 2016 02:39 IST

देशभरातील नागरिकांना ‘आधार कार्ड’ जारी करणाऱ्या ‘युआयडीएआय’च्या (युनिक आयडेंटिफिकेशन आॅथारिटी आॅफ इंडिया)

केंद्रीय माहिती आयोगाचे ताशेरे : तक्रारकर्त्याला हजार रुपयांची भरपाई देण्याचे निर्देशयोगेश पांडे नागपूरदेशभरातील नागरिकांना ‘आधार कार्ड’ जारी करणाऱ्या ‘युआयडीएआय’च्या (युनिक आयडेंटिफिकेशन आॅथारिटी आॅफ इंडिया) कारभारावर केंद्रीय माहिती आयोगाने नाराजी व्यक्त करीत ताशेरे ओढले आहे. कोट्यवधी जनतेशी निगडित मुद्यावर माहितीचा अधिकारांतर्गत माहिती देण्याच्या प्रक्रियेत हलगर्जीपणा केल्याबाबत आयोगाने ‘युआयडीएआय’ला चांगलेच फटकारत तक्रारकर्त्याला १ हजार रुपयांची भरपाई देण्याचेदेखील निर्देश दिले. नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अविनाश प्रभुणे यांनी यासंदर्भात मोठा लढा दिला.केवळ आधार कार्ड जवळ बाळगले की, अन्य कोणतीही कागदपत्रे बाळगण्याची गरज राहणार नाही, असा दावा केंद्र शासनाकडून करण्यात आला होता. परंतु सुरुवातीच्या २० कोटी आधार कार्डांवर नागरिकांच्या जन्मतारखेची नोंदच नव्हती. प्रभुणे यांनी २०१२ साली केलेल्या माहिती अधिकारामुळेच ही बाब समोर आली होती. त्यानंतर ‘युआयडीएआय’ने याची दखल घेत सप्टेंबर २०१३ नंतरच्या आधार कार्डांवर जन्मतारखेची नोंद घेणे सुरू केले.परंतु त्याअगोदरच्या २० कोटी आधार कार्डांसाठी केंद्र शासनाने २ हजार कोटी रुपये खर्च केले होते. त्यामुळे ‘युआयडीएआय’चे तत्कालीन चेअरमन नंदन नीलेकणी यांना २० कोटी नागरिकांना परत आधार कार्ड जारी करावे, अशी विनंती करणारे पत्र प्रभुणे यांनी २० एप्रिल रोजी लिहिले. परंतु यासंदर्भात ‘युआयडीएआय’कडून कुठलेही उत्तर आले नाही. त्यामुळे २६ जून २०१३ रोजी प्रभुणे यांनी संबंधित पत्रावर विभागाने काय कारवाई केली हे जाणून घेण्यासाठी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली. यावरदेखील उत्तर न आल्याने त्यांनी केंद्रीय माहिती आयोगाकडे पहिले व दुसरे अपिल केले. त्यावर मार्च १५ मध्ये केंद्रीय माहिती आयुक्त शरत सभरवाल यांच्यापुढे सुनावणी झाली. त्या सुनावणीमध्ये प्रभुणे यांच्या प्रश्नांना नेमके उत्तरे देण्याचे आदेश दिले. यानंतर २ महिन्यांतच प्रभुणे यांना जन्मतारखेची नोंद असलेले नवीन आधार कार्ड पाठविण्यात आले. परंतु २० कोटी कार्डधारकांना सुधारित आधारकार्ड जारी करण्याबाबत कुठलीही पावले उचलण्यात आली नसून प्रभुणे यांचे संबंधित पत्र गहाळ झाले असल्याचे कळविण्यात आले.