शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रभारी’ मुद्यावरून राजकारण तापले

By admin | Updated: February 13, 2015 02:14 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील शिक्षकेतर पदांची भरती अद्यापही रखडली आहे. या पदभरतीवरून विद्यापीठात दोन गट निर्माण झाले असून ....

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील शिक्षकेतर पदांची भरती अद्यापही रखडली आहे. या पदभरतीवरून विद्यापीठात दोन गट निर्माण झाले असून ‘प्रभारी’ मुद्याला समोर करून यावर राजकारण करण्यात येत आहे. नवीन कुलगुरू येण्याअगोदर ‘प्रभारी’ अधिकाऱ्यांच्या भरवशावर ही पदभरती करण्याचा प्रयत्न असल्याची तक्रार राज्यपाल कार्यालयाला करण्यात आली होती. यासंदर्भात राज्यपाल कार्यालयाने विद्यापीठाला काही मुद्यांवर विचारणा केली आहे. परंतु पदभरती थांबवा, असे या पत्रात कुठेही नमूद नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.नागपूर विद्यापीठाने २०१३ साली ५६ शिक्षकेतर रिक्त पदांसाठी जाहिरात काढली होती. त्यानंतर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी राजीनामा दिला. त्यामुळे या पदभरतीसाठी मुलाखतीच झाल्या नाहीत. दरम्यानच्या काळात रोस्टरमध्ये बदल, मराठा-मुस्लिम आरक्षण मंजुरी, स्थगिती असे अनेक बदल घडले. विद्यापीठात लवकरच नवीन कुलगुरू येणार आहेत. शिवाय कुलसचिव डॉ. गोमाशे हेदेखील ३१ मार्च रोजी पद सोडणार आहेत. अशा स्थितीत ही पदभरती लवकरात लवकर करण्यात यावी, असा आग्रह विद्यापीठातील एका गटाकडून धरण्यात येत आहे. जुन्याच दिशानिर्देशांनुसार पदभरती व्हावी अशी मागणीदेखील करण्यात आली तर एका गटातर्फे नवीन दिशानिर्देशांप्रमाणे नव्याने जाहिरात काढण्याचा आग्रह धरण्यात येत आहे. यामुळे नव्या उमेदवारांना संधी मिळेल, असा युक्तिवाद करण्यात येत आहे.यातूनच ‘प्रभारी’ अधिकाऱ्यांनी पदभरती करण्याची आवश्यकता काय व प्रशासनाला इतकी घाई का झाली आहे अशा आशयाची तक्रार एका गटाकडून राज्यपालांकडे करण्यात आली होती. यासंदर्भात राज्यपाल कार्यालयाने काही मुद्यांवर विद्यापीठाकडे विचारणा केली आहे. परंतु पदभरती थांबविण्यात यावी किंवा पुढे ढकलण्यात यावी असे कुठेही म्हटलेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.