शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

लेखापेक्षा छायाचित्र प्रभावी

By admin | Updated: August 20, 2014 01:09 IST

छायाचित्र जीवनाशी निगडित असते. त्यामुळेच तो जिव्हाळ्याचा प्रश्न ठरतो. एखादा लेख जे सांगू शकत नाही, ते एका छायाचित्रातून प्रगट होते, म्हणूनच छायाचित्र कधीही लेखापेक्षा प्रभावी ठरते,

ज्येष्ठ छायाचित्रकारांचा सत्कार : नागपूर प्रेस फोटोग्राफर्स असो.चा उपक्रम नागपूर : छायाचित्र जीवनाशी निगडित असते. त्यामुळेच तो जिव्हाळ्याचा प्रश्न ठरतो. एखादा लेख जे सांगू शकत नाही, ते एका छायाचित्रातून प्रगट होते, म्हणूनच छायाचित्र कधीही लेखापेक्षा प्रभावी ठरते, असे प्रतिपादन नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती प्रवीण दराडे यांनी केले. नागपूर प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनच्यावतीने जागतिक छायाचित्रदिनाचे औचित्य साधून आयोजित ज्येष्ठ छायाचित्रकारांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. बजाजनगर चौकातील ‘विष्णुजी की रसोई’ येथे मंगळवारी हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर-अमरावती विभागाचे माहिती व जनसंपर्क संचालक मोहन राठोड होते. मंचावर जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे, देवेन दस्तुरे, सत्कारमूर्ती अरविंद पुरंदरे, नागपूर प्रेस फोटोग्राफर्स असो.चे अध्यक्ष राजेश टिकले व उपाध्यक्ष प्रशिक डोंगरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते ज्येष्ठ छायाचित्रकार अरविंद पुरंदरे यांना शाल-श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख पाच हजार रुपयांचा पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच दुसरे सत्कारमूर्ती अशोक सवाने यांची प्रकृती चांगली नसल्याने ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे असो.च्या पदाधिकाऱ्यांनी मोहन राठोड यांच्यासह सकाळी सवाने यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना पुरस्कार प्रदान केला. दराडे पुढे म्हणाले, नागपूर प्रेस फोटोग्राफर्स असो.च्या माध्यमातून हा स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यातून ज्येष्ठ छायाचित्रकारांच्या कलेची जाणीव होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मोहन राठोड यांनी छायाचित्रकार क्षेत्रात अलीकडे आधुनिक बदलासह फार मोठी स्पर्धा निर्माण झाली असल्याचे स्पष्ट केले. फोटोग्राफी ही फार कठीण कला आहे. छायाचित्रकाराची नजर ही तीक्ष्ण असावी लागते. तो कधीही पैसा किंवा मानसन्मानाची अपेक्षा करीत नसतो. त्याला केवळ शाबासकी हवी असते. तो अनेकदा जीव धोक्यात घालून छायाचित्र काढत असतो. मग दंगल असो की, नैसर्गिक आपत्ती. त्याची तो कधीही पर्वा करीत नाही. तो केवळ बोलके छायाचित्र काढण्याचा विचार करीत असतो, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला विविध वर्तमानपत्रांच्या संपादकांसह पत्रकार व छायाचित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन असो.चे सचिव अनंत मुळे यांनी केले. प्रशिक डोंगरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)