शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शनर्सना पेन्शनची थकबाकी पाच समान हप्त्यात देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 21:03 IST

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने सहा. संचालक लेखा व कोषागार विजय कोल्हे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पेन्शनर्सची पेन्शन थकबाकी पाच समान हप्त्यात देणार असल्याचे सांगितले.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१८ या काळात सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ व थकबाकी अजूनही मिळाली नाही. विशेष म्हणजे महालेखाकार यांनी वेतन पडताळणीस मान्यताही प्रदान केली आहे. परंतु आवश्यक असलेली टॅब प्रणाली उपलब्ध नसल्यामुळे पेन्शनर्सना त्याचा लाभ व थकबाकी मिळू शकली नाही. यासंदर्भात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने सहा. संचालक लेखा व कोषागार विजय कोल्हे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पेन्शनर्सची पेन्शन थकबाकी पाच समान हप्त्यात देणार असल्याचे सांगितले.२०१६ पासून शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. परंतु त्यानंतर निवृत्त झालेल्या शिक्षकांना पेन्शनमध्ये सातव्या वेतन आयोगाचा लाभ व थकबाकी मिळालेली नाही. यासंदर्भात संघटनेने सहा. संचालक लेखा व कोषागार विजय कोल्हे यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी टॅब प्रणाली उपलब्ध नसल्याचे मान्य केले. यावेळी त्यांनी सांगितले की, महालेखाकाराची मंजुरी प्रदान करूनही पेन्शनचा लाभ न मिळणाऱ्या शिक्षकांची विभागात ८०० ते ८५० असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी संघटनेसमोर पेन्शनच्या थकबाकीचे पाच समान हप्त्यात जमा करण्याचे आदेश दिले. संगणक प्रणाली लवकरच उपलब्ध होण्यासाठी आयटी विभागाशी चर्चा केली. ही सर्व प्रकरणे ३० नोव्हेंबरपर्यंत निकाली काढून वाढीव पेन्शन खात्यात जमा करण्याबाबत आश्वस्त केले. शिष्टमंडळात प्रमोद रेवतकर, विजय नंदनवार, मोहन परसोडकर, अरुण नवरे, पितांबर गायधने, अरुण किरफाडे, अतुल ठाकरे आदींचा समावेश होता.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतनTeacherशिक्षकnagpurनागपूर