फेक वेबसाईटच्या माध्यमातून रुग्णांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 07:00 IST2021-04-22T07:00:00+5:302021-04-22T07:00:19+5:30
Nagpur news कोरोनाबाबत नागरिकांमध्ये असलेल्या भीतीचा फायदा घेत त्यांना फेक वेबसाईटच्या माध्यमातून लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

फेक वेबसाईटच्या माध्यमातून रुग्णांची फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाबत नागरिकांमध्ये असलेल्या भीतीचा फायदा घेत त्यांना फेक वेबसाईटच्या माध्यमातून लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
'पतंजली' या नावाने एक फेक वेबसाईट तयार करून रुग्णांना त्यांच्या जवळच्या परिसरातील रुग्णालयात बेड उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी प्रति दिवस दोन हजार रुपये असे १५ दिवसांसाठी ३० हजार रुपये जमा करावे, अशी जाहिरात या वेबसाईटवरून करण्यात येत आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांनी हा प्रकार मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आणला. त्याची तातडीने शहानिशा करून नागरिकांची लुबाडणूक थांबवावी, अशी सूचना केली.
या वेबसाईटचे सत्य नेमके काय हे उघडकीस आणून नागरिकांची होणारी लुबाडणूक थांबवावी, अशी सूचना प्रशासनाला केली आहे.