शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे कारण दाखवून प्रवाशांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:19 IST

आशीष दुबे नागपूर : उत्तर प्रदेशातील वाराणसी व प्रयागराज आदी शहरांतून येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसमध्ये कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष ...

आशीष दुबे

नागपूर : उत्तर प्रदेशातील वाराणसी व प्रयागराज आदी शहरांतून येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसमध्ये कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रवाशांकडून मनमानी प्रवास भाडे वसूल केले जात आहे. प्रवाशांकडून लगेजचे अतिरिक्त शुल्क वसूल केले जात आहे. प्रवाशांनी विरोध केल्यास अर्धा प्रवासातूनच उतरविण्याची धमकी दिली जात आहे.

खासगी बसेसमध्ये कोरोना नियमांचे दुर्लक्ष होत असले तरी पोलीस व प्रशासनाकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आरटीओचे अधिकारीसुद्धा वाहनांची तपासणी करत नाही. ‘लोकमत’च्या पथकाने खासगी प्रवासी वाहनांमध्ये होत असलेल्या मनमानी संदर्भात आढावा घेतला असता, स्लीपर बसच्या एका सीटवर दोन व्यक्तीच्याजागी तिघांना बसविले जात आहे. बसमध्ये कुठलीही साफसफाई नसते. बस सॅनिटाईज केली जात नाही. प्रवाशांना मास्कचे बंधन नसते. बसमध्ये आसन व्यवस्था अतिशय निकृष्ट दिसून आली. वाराणसीहून नागपूरला येत असलेल्या बसचे भाडे प्रत्येक ऑपरेटरचे वेगवेगळे आहे. नॉन एसी सिटिंगचे भाडे १३५० व नॉन एसी स्लीपरचे भाडे १६५० रुपये वसूल केले जात आहे. एसी बसचे भाडे २२०० ते २५०० रुपयांपर्यंत वसूल केले जात आहे. सोबतच बसमध्ये बसण्यापूर्वी प्रवाशांकडून प्रतिबॅग २० रुपये वसूल केले जात आहे. याला विरोध केल्यास प्रवाशांना धमकी दिली जाते की लगेजचे भाडे न दिल्यास सामान ठेवू दिले जाणार नाही.

- रेल्वेचे रिझर्वेशन मिळत नसल्यामुळे उचलत आहे लाभ

कोरोनामुळे रेल्वे गाड्या फार कमी धावत आहे. रिझर्व्हेशन कन्फर्म असेल तरच प्रवास शक्य आहे. ज्या प्रवाशांना रेल्वेचे रिझर्व्हेशन मिळत नाही, ते बसमध्ये प्रवास करतात. त्यात बहुतांश लोक मजूरवर्गातील असतात. लॉकडाऊन लागल्यामुळे अनेक लोकं शहरातून आपल्या गावी परतले होते. ते आता शहरात परतत आहे.