शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
3
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
4
IPL 2024 DC vs MI: मुंबईने टॉस जिंकला! हार्दिकने रिषभच्या मनासारखा निर्णय घेतला, पृथ्वीला विश्रांती
5
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
6
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
7
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
8
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
9
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
10
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
11
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
12
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
13
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
14
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
15
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
16
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
17
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
18
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
19
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
20
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला

शाळांच्या शुल्क वाढीविरोधात पालकांमध्ये असंतोष : मशाल मोर्चा काढून केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 10:18 PM

राज्यामध्ये इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांद्वारे शासकीय नियमांचे उल्लंघन करून अवैध मार्गाने पालकांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क उकळले जात आहे.

ठळक मुद्देजागरूक पालक समितीचे अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यामध्ये इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांद्वारे शासकीय नियमांचे उल्लंघन करून अवैध मार्गाने पालकांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क उकळले जात आहे. शाळांच्या मनमानीमुळे पर्याय नसलेल्या पालकांना हा हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागतो. याविरोधात पालकांमध्ये असंतोष वाढत आहे. हा असंतोष व्यक्त करण्यासाठी पालकांनी बुधवारी मशाल मोर्चा काढून शाळांच्य शुल्कवाढीचा निषेध केला. 

जागरूक पालक समितीच्या माध्यमातून प्रतापनगर ते माटे चौक व परत प्रतापनगरपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी शहरातील खासगी शाळा पीडित शेकडो पालक सहभागी झाले होते. समितीच्या डॉ. प्रियंका हाडके यांनी लोकमतशी बोलताना सांगितले, दिल्ली आणि देशातील काही राज्यात चांगल्या दर्जाचे शिक्षण तेथील शासनाकडून मोफत किंवा कमी पैशात दिले जात आहे. महाराष्ट्रात मात्र पालकांना शाळांची भरमसाट फीचा भुर्दंड सोसावा लागतो आहे. शासकीय नियमानुसार ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर सामाजिक भावनेतून शाळा चालविण्यासाठी शासनाकडून परवानगी घेतली जाते. मात्र ही सामाजिक भावना बाजूला ठेवून आज शाळांनी व्यवसाय सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला. या शाळा १५ ते २० हजार फी घेउन आरामात चालवू शकतात. मात्र शाळा व्यवस्थापनाद्वारे पुस्तके, गणवेश आदींच्या नावाने ४० ते ५० हजार किंवा त्यापेक्षा अधिक शुल्क वसूल केले जात आहे. शाळांच्या या मनमानीमुळे पालक हतबल झाले आहेत. असेच सुरू राहिले तर पालकांवरही आत्महत्या करण्याची वेळ येईल, असा रोष व्यक्त करीत यासाठी राजकीय अनास्था कारणीभूत असल्याची टीका डॉ. हाडके यांनी केली. याविरोधात पालकांना जागृत करण्यासाठी मशाल मोर्चा काढण्यात आला. यामध्ये ३०० च्यावर पालक सहभागी झाले. यवतमाळ येथून २०० पालक समितीशी जुळले असून यातील काही सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले. वार्षिक फी १८ ते २० हजार असावी, शासकीय नियमानुसार पीटीएला विश्वासात घेऊन फी वाढ करावी, केवळ शासनाने निर्धारीत केलेली किंवा एनसीईआरटीची पुस्तके शाळांमध्ये अनिवार्य करावी, आदी मागण्या याद्वारे करण्यात येत आहेत. मोर्चा आयोजनात चित्रलेखा नायडू, अमोल हाडके, योगेश पाथरे, गिरीश पांडे, अमोल फाये, स्मिता काजने, स्वरेषा दमके, मंगला गजभिये, अर्चना देशपांडे, मयुरी टेंभुर्णे आदींचा सहभाग होता.

टॅग्स :SchoolशाळाMorchaमोर्चा