शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूरचा पांडुरंग हा श्रीकृष्ण वंशाचाच वारसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:48 IST

नागपूर : पंढरपूचा पांडुरंग हा शैव व वैष्णव परंपरेचे प्रतीक हाेय. पुराणातील दाखल्यानुसार भगवान श्रीकृष्णाच्या मुलाला महाराेग झाल्यानंतर गुरुस्थानी ...

नागपूर : पंढरपूचा पांडुरंग हा शैव व वैष्णव परंपरेचे प्रतीक हाेय. पुराणातील दाखल्यानुसार भगवान श्रीकृष्णाच्या मुलाला महाराेग झाल्यानंतर गुरुस्थानी असलेल्या ऋषींनी त्यांना पाशुपतांची आरधना करण्यास सांगितले हाेते. भगवान शिव म्हणजे श्रीकृष्णाच्या वंशजाचे दैवत म्हणजेच गुरू हाेते. विठ्ठल म्हणजे विष्ण म्हणजेच श्रीकृष्ण हे त्यांचे गुरू भगवान शिव म्हणजेच पांडुरंग यांना डाेक्यावर घेऊन उभे आहेत, असे दाखले पुराणात सापडतात. म्हणजेच देवतांमध्येही गुरू-शिष्याचे नाते हाेते. यावरून पांडुरंग हे भगवान श्रीकृष्णाच्या वंशाचा वारसा हाेय, असा संशाेधनात्मक अंदाज प्रसिद्ध संत साहित्य संशाेधक व अभिलेखतज्ज्ञ डाॅ. म. रा. जाेशी यांनी व्यक्त केला.

विदर्भ संशाेधन मंडळाच्या साप्ताहिक संगाेष्ठीअंतर्गत रविवारी पांडुरंग विठ्ठल यावर डाॅ. जाेशी यांचे संशाेधनात्मक व्याख्यान आयाेजित केले. डाॅ. जाेशी यांनी देशात सापडलेले विविध शिलालेख तसेच स्कंद पुराण, विष्णू पुराण, मत्स्यपुराण आदींमधील उदाहरणे सादर केली. पांडुरगाबद्दल असलेल्या अनेक आख्यायिका जाेडून त्यांनी वर्णन केले. पांडुरंगाचा संदर्भ दक्षिणेकडील आंध्र प्रदेश व आताचे तेलंगणा राज्यांमधील एका राजाच्या सेनापतीशीही जुळते. पाशुपत परंपरेतील या साधकाचे नावही पांडुरंग असेच हाेते. पांडुरंग आणि विठ्ठल यांच्यात गुरु शिष्याचे नाते हाेते. इसवी सनापूर्वी दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकात हा उल्लेख सापडताे. विष्णू म्हणजेच भगवान श्रीकृष्णाचे वंशज शैव परंपरेचे साधक हाेते व तेच भ्रमंती करताना महाराष्ट्राच्या पंढरपूरला आले असावे, असा अंदाज डाॅ. जाेशी यांनी व्यक्त केला. भगवान विष्णू यांच्या पुराणातील उल्लेखात आषाढी एकादशीच्या यात्रेचा उल्लेख सापडताे. तीच परंपरा आजही पंढरपुरात सुरू असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. असे विविध उदाहरणे देऊन डाॅ. जाेशी यांनी त्यांच्या संशाेधनातील दुवे समजाविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संयाेजन संशाेधन मंडळाचे व्यवस्थापक डाॅ. शेषशयन देशमुख यांनी केले.