गंगाजमुनातील देहव्यापारातून सुटका करून बालसुधारगृहात रवानगी करण्यात आलेल्या एका मुलीने वेगळाच दावा केला आहे. आपण अल्पवयीन नसून बालसुधारगृहातून आता मुक्तता करण्यात यावी, अशी याचिका तिने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर दाखल केली आहे. तिने त ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाने शिक्षक निवड व नियुक्तीसंदर्भातील एका अध्यादेशाला अवैध घोषित करत एक मोठा दणका दिला आहे. शाळा व्यवस्थापनांना शिक्षक निवड व नियुक्तीचा अधिकार आहे. शाळांनी ‘पवित्र’च्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांचीच ...
देशातील रस्ते व पुलांचे नियम आणि कोड (मानक) तयार करण्याचे काम इंडियन रोड काँग्रेस (आयआरसी) करीत असते. रस्ते व पुलासंदर्भात डिझाईनपासून तर सुरक्षेपर्यंतचे काही कोड आयआरसीने तयार केले असून यापैकी १४ कोड हे नागपुरातील अधिवेशनातच जाहीर करण्यात येणार आहेत ...
शहरातील वर्दळीच्या व बाजार भाग असलेल्या इतवारी, महाल, गांधीबाग, लालगंज यासह अरुंद रस्ते असलेल्या वस्त्यांतील आग नियंत्रणसाठी उपयोगी ठरणारे चार मिनी फायर टेंडर महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात दाखल झाले आहेत. ...
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी चीनमध्ये तीन-तीन कोचेसच्या दोन मेट्रो रेल्वे तयार झाल्या आहेत. तांत्रिक तपासण्या पूर्ण झाल्यानंतर त्यापैकी एक रेल्वे गुरुवार, २२ नोव्हेंबरला महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित आणि रोलिंग स्टॉक संचालक स ...
नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा ठगबाज नागसेन वेल्लोर हा ऐशोआराम व मटक्याचा शौकीन आहे. तो लोकांना फसवून जमवलेली रक्कम मैत्रिणी आणि मटक्यावर उडवत होता. पोलिसांपासून वाचण्यासाठी नागसेन दोन महिन्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी भाड्याच्या घर ...
मित्राला चाकू खुपसून जखमी केल्याची घटना अवैध दारू विक्रीच्या वादातून झाल्याची माहिती आहे. खरा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून जखमी आणि आरोपी दोघेही पोलिसांना सूचना न देता घरी परत गेले होते. वस्तीत खळबळ उडाल्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती देण्या ...
शहर पोलिसांनी आॅपरेशन ‘क्रॅक डाऊन’ अंतर्गत सहा दिवसात ४२५२ गुन्हेगारांची चौकशी, तपासणी अर्थात ‘स्कॅन’ केले आहे. पोलिसांनी ३२८ गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई केली आहे. शहर पोलिसांच्या या मोहिमेमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. ...
निवडणूक विशेष रेल्वे गाडीत बेवारस स्थितीत ४६४ काडतुसे सापडली. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच नागपूर रेल्वे स्थानकावर खळबळ उडाली. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही काडतुसे रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केली. ...
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यजमानपदाखाली मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे होणाऱ्या इंडियन रोड काँग्रेसच्या ७९ व्या अधिवेशनाच तयारी पूर्ण झाली असून २२ नोव्हेंबरपासून अधिवेशनाला सुरुवात होत आहे. हे अधिवेशन नागपुरात चौथ्यांदा होत असून देश-विदेश ...