वर्धा रोडवर हॉटेल रेडिसन ब्ल्यूजवळ एका ट्रॅव्हल्स बसला अपघात झाला. या बसमध्ये जवळपास ४० प्रवासी असल्याची माहिती आहे. यात १० ते १२ प्रवासी जखमी झाले. जखमींना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात बुधवारी सकाळी घडला. ...
गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या युनिट -१ परिसराला बुधवारी सायंकाळच्या सुमारास आग लागली. मात्र, त्यावर त्वरित नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश आल्याने अनर्थ टळला. ...
शांतिनगर येथे प्रवीण ऊर्फ शशी गायधने याची मारहाण करून हत्या करणारा गुन्हेगार आणि त्याच्या कुटुंबीयांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप करीत बुधवारी रात्री संतप्त नागरिकांनी शांतिनगर पोलीस ठाण्याला घेराव घातला. ...
आंतरिक फेरबदलांतर्गत बुधवारी शहर पोलिसातील ठाणेदारांसह ११ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी बुधवारी रात्री यासंबंधीचे आदेश जारी केले. ...
अडीच कोटी रुपयाची बोगस बँक गॅरंटी देऊन एका शासकीय कंत्राटदाराची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी कोलकातातील शकुंतला पार्क येथील आयसीआयसीआय बँकेचे मॅनेजर सगनिंग रॉय यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
पोर्ट ओ गोमेज रेस्टॉरंटचे संचालक आल्विन गोम्सने ग्राहकांकडून वसूल करण्यात आलेले दीड कोटी रुपयेसुद्धा हजम केल्याचे उघडकीस आले आहे. परंतु पोलिसांनी विचारपूस केली असता गोम्सने हा आरोप नाकारला आहे. ...
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना शहरात विविध संघटनांतर्फे कॅन्डल मार्च आणि दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली देण्यात येत आहे. याअंतर्गत बुधवारी नागपूर शहरासह जिल्ह्यातील पेट्रोल पंपचालकांनी सीआर ...
शहरात सर्वत्र सिमेंट रोडचे काम सुरु आहे. परंतु बहुतांश भागातील रस्त्यांची कामे संथ गतीने सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गिट्टीखदान बोरगाव येथील सिमेंट रोड होय. या रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. परंतु अद्य ...
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि नागपूर महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागपुरात हजारो वाहन चालकांना रोज मनस्ताप सहन करत स्वत:चा आणि कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालावा लागत आहे. अमरावती रोडवरील विद्यापीठ कॅम्पस ते वाडी नाक्यापर्यंतच्या रस्त्याच्या दुरवस ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित भंडाऱ्यातील फाशी प्रकरणावर गुरुवारी न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे. ...