शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

सहापैकी एकच कोविड केअर सेंटर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:12 IST

नागपूर : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोविड केअर सेंटरची भूमिका महत्त्वाची असते, परंतु डिसेंबरमध्ये रुग्णसंख्या कमी होताच, पाचपावली सेंटर वगळता ...

नागपूर : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोविड केअर सेंटरची भूमिका महत्त्वाची असते, परंतु डिसेंबरमध्ये रुग्णसंख्या कमी होताच, पाचपावली सेंटर वगळता आमदार निवास, वनामती, सिम्बायोसिस व ओरीएन्ट ग्रॅण्ड हॉटेल बंद करण्यात आले. आता पुन्हा बाधितांची संख्या वाढत असताना, हे सेंटर सुरू करण्याचे प्रशासन विचार करीत आहे. विशेष म्हणजे, यातील आमदार निवासात खेळाडू, तर वनामतीमध्ये प्रशिक्षणासाठी आलेले कर्मचारी थांबलेले आहेत, इतर सेंटर रुग्णांसाठी बंद आहेत. यामुळे पुन्हा ही यंत्रणा उभी करणे प्रशासनाला कठीण जाणार आहे.

नागपूर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी आज ७००वर कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर मागील सात दिवसांपासून दैनंदिन बाधितांच्या संख्येत ५००ची भर पडत आहे. बाधितांची एकूण संख्या १,४३,८४३ झाली आहे. सध्या ६,२६२ रुग्ण उपचाराखाली आहेत. यातील लक्षणे नसलेली किंवा सौम्य लक्षणे असलेली ४,४५३ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, तर १,८०९ रुग्ण विविध शासकीयसह खासगी रुग्णालयात भरती आहेत, परंतु ज्या रुग्णांच्या घरी आयसोलेशनच्या सोयी नाहीत, तेही रुग्ण घरी आहेत. परिणामी, कुटुंबात संसर्ग वाढण्याचा धोका वाढला आहे. विशेष म्हणजे, मनपाच्या आरोग्य विभागाने दरम्यानच्या काळात गंभीरतेने घेतले नव्हते, परंतु आता बाधितांची संख्या वाढताच, कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा विचार करीत आहेत.

- पाचपावलीमध्ये २९ रुग्ण

‘लोकमत’ चमूने सोमवारी आमदार निवास, वनामती, ओरीएन्ट ग्रॅण्ड हॉटेल, सिम्बायोसिस, व्हीएनआयटी व पाचपावली कोविड केअर सेंटरला भेट दिली. यातील एकट्या पाचपावली सेंटरमध्ये २९ रुग्ण वगळता इतर पाचही सेंटर रुग्णांसाठी बंद आहेत. यातील आमदार निवासातील इमारत क्रमांक २ व ३ मध्ये दिव्यांग क्रिकेट खेळाडूंना ठेवण्यात आले आहे, तर वनामतीच्या वसतिगृहात प्रशिक्षणासाठी आलेले कर्मचारी आहेत. उर्वरित सेंटर रुग्णांसाठी बंद आहेत.

- ग्रामीणमधील तीनच सेंटर सुरू

नागपूर जिल्ह्यात १४ तालुके आहेत. कोरोनाच्या आणीबाणीच्या काळात प्रत्येक तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. सध्याच्या स्थितीत तीनच तालुक्यांत कोविड केअर सेंटर सुरू आहेत. यात भिवापूर तालुक्यातील सेंटरमध्ये ३, हिंगणा सेंटरमध्ये ५ तर उमरेड सेंटरमध्ये ३ रुग्ण आहेत. सध्याच्या स्थितीत ग्रामीणमध्ये १,०९३ रुग्ण आहेत. यामुळे कोरोनाला नियंत्रणात आणण्यास येथेही सेंटर सुरू करणे गरजेचे झाले आहे.

- कोविड केअर सेंटरमधील स्थिती

सेंटरस्थिती

आमदार निवास बंद

वनामती बंद

ओरीएन्ट ग्रॅण्ड हॉटेलबंद

सिम्बायोसिस बंद

व्हीएनआयटीबंद

पाचपावली २९ रुग्ण