शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? मोदी सरकारनं दिले मोठे संकेत!
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
5
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
6
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
7
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
8
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
9
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
10
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
11
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
12
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
13
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
14
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
15
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
16
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
17
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
20
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाकडून संमेलनाध्यक्षपदासाठी केवळ भारत सासणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:07 IST

- राष्ट्रवादीचा किल्ला वाघमारेंच्या मागे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नाशिक येथे नियोजित ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ...

- राष्ट्रवादीचा किल्ला वाघमारेंच्या मागे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नाशिक येथे नियोजित ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे नाव जाहीर होण्याच्या एक दिवस आधी राजकारण, साहित्यकारण आणि अट-कारणाचा खेळ रंगला आहे. जयंत नारळीकर, भारत सासणे आणि जनार्दन वाघमारे यांच्यापैकी एक नाव निश्चित होणार आहे. विदर्भ साहित्य संघाकडून अध्यक्षपदासाठी तीन नावे देण्याचा पर्याय असताना, केवळ प्रसिद्ध साहित्यिक भारत सासणे यांचे एकट्याचेच नाव पाठविण्यात आल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

संमेलनस्थळ जाहीर होताच भारत सासणे यांचे अध्यक्षपदासाठीचे नाव अग्रक्रमाने चर्चेत आले होते. घुमान साहित्य संमेलनातील मानापमान नाट्यामुळे, महामंडळ अध्यक्षांची पसंती त्यांच्याच नावाला असल्याचेही बोलले जाते. विदर्भ साहित्य संघासाठीही आपुलकीचा विषय असल्याच्या कारणाने घटकसंस्था म्हणून भारत सासणे यांचे एकट्याचेच नाव अध्यक्षपदासाठी म्हणून सुचविण्यात आले आहे. तसे पाहता प्रत्येक घटक संस्थेला तीन नावांचे पर्याय देण्याचा अधिकार आहे. मात्र, वि. सा. संघाने दुसऱ्या कुणाचेही पर्याय देण्यापेक्षा सासणे यांच्याच नावाचा विचार केला आहे. विशेष म्हणजे, अध्यक्षपदासाठी जेव्हा निवडणुका घेतल्या जात होत्या तेव्हा विदर्भ साहित्य संघ ज्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करत असे, तोच उमेदवार अध्यक्षपदी विराजमान होत असल्याचा इतिहास आहे. मात्र, जेव्हापासून निवडणुका बाद करण्यात आल्या, तेव्हापासूनचे चित्र बदलले आहे. तरीदेखील महामंडळ आणि विदर्भ साहित्य संघ यांच्यात सासणे यांच्या नावावरून एकमत होत असल्याने सासणेच अध्यक्ष होतीत, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

त्यातच नाशिक साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून छगन भुजबळ यांच्याच नावाची चर्चा आहे. अध्यक्षपदाच्या घोषणेसोबतच स्वागताध्यक्षांचीही घोषणा होईल. त्याच अनुषंगाने माजी महापौर व खासदार प्रसिद्ध साहित्यिक डॉ. जनार्दन वाघमारे यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. त्यामुळे, सासणे की वाघमारे अशा विवंचनेत महामंडळ आहे. त्यावर तोडगा म्हणून महामंडळाकडून प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ व लेखक डॉ. जयंत नारळीकर यांना आधीपासूनच विचारणा केली जात होती. वाढते वय आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे नारळीकरांनी प्रारंभी नकार कळविल्यानंतर आता त्यांनी काही अटींसकट प्रस्तावाला संमती दिली आहे. केवळ उद्घाटनाला ते उपस्थित राहतील, उर्वरित तीनही दिवस ते नसतील, ऑनलाइन भाषण व मुलाखत देतील, अशा त्या अटी आहेत. नारळीकर हे अध्यक्ष झाल्यास प्रथमच विज्ञान क्षेत्रातील साहित्यिकाला हा बहुमान मिळणार आहे. विशेष म्हणजे, नारळीकरांच्या नावाला कुणाचा विरोधही नाही. त्यामुळे त्यांच्या नावाचे पारडे जड ठरत आहे.

गेल्या संमेलनात परंपरा खंडित

गेल्या संमेलनात संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची ऐनवेळी प्रकृती बिघडली होती. त्या वेळी त्यांनी व्हीलचेअरवर उपस्थित राहून संमेलनाचे उद्घाटन केले होते आणि नंतर उपचारासाठी मुंबईला गेले होते. इतिहासात प्रथमच संमेलनाध्यक्षांच्या अनुपस्थितीत संमेलनाचा समारोप झाला होता. यंदा नारळीकरांनी सादर केलेली अट महामंडळाने मान्य केल्यास, इतिहासाची पुनरावृत्ती लागोपाठ होणार आहे. अशा स्थितीत संमेलनाध्यक्ष पदाबाबत अनेक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

..........