लोकमत न्यूज नेटवर्ककामठी : स्वयंपाकघरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने येथील गांधीनगर भाजीमंडी परिसरात रविवारी (दि. १९) सकाळी घराला भीषण आग लागली. यामध्ये अतुल उर्फ बंटी दशरथ पानतावणे (वय ४०) यांचा धुरामुळे गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत सात जण जखमी झाले असून, कुटुंबाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत अतुल पानतावणे हे पत्नी आणि तीन मुलांसह गांधीनगर परिसरात वास्तव्यास होते. रविवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांची पत्नी स्वयंपाकघरात चहा बनविण्यासाठी गेली असता, अचानक गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. स्फोटामुळे आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले.
बचावासाठी अतुल यांची पत्नी आणि तीन मुले घराबाहेर पळाली. मात्र, बेडरूममध्ये झोपलेले अतुल धुराच्या विळख्यात सापडले. घराबाहेर पडता न आल्याने धुरामुळे गुदमरून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पाच लाख रुपयांचे नुकसान
या भीषण आगीत पानतावणे कुटुंबाचे संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. घरातील जीवनावश्यक वस्तू, सोन्याचे दागिने, टीव्ही, फ्रीज आणि कपडे अशा एकूण ५ लाख रुपयांहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. कर्ता पुरुष गमावल्याने आणि संसार उघड्यावर आल्याने शासनाने या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
Web Summary : A cylinder explosion in Kamthi's Gandhinagar killed one and injured seven. Atul Pantawane died from smoke inhalation. The fire destroyed the house, causing significant financial loss. Locals are requesting immediate financial aid for the family.
Web Summary : कामठी के गांधीनगर में सिलेंडर फटने से एक की मौत, सात घायल। अतुल पानतावणे की धुएं से दम घुटने से मौत हो गई। आग ने घर को नष्ट कर दिया, जिससे भारी आर्थिक नुकसान हुआ। स्थानीय लोग परिवार के लिए तत्काल वित्तीय सहायता का अनुरोध कर रहे हैं।